महाराष्ट्र

Koyna Dam Water Level : कोयना धरणात पाणीसाठा किती आहे शिल्लक ? वाचा इथे

Koyna Dam Water Level : कोयना धरणांतर्गत विभागासह पाटण तालुक्यात पावसाचा जोर ओसरला असून धरण पाणीसाठ्यात संथगतीने वाढ होत आहे. चोवीस तासात धरणातील पाणीसाठ्यात ०.७८ टीएमसीने तर पाणी उंचीत १. ९ फूटाने वाढ झाली आहे.

धरणात आता एकूण उपलब्ध पाणीसाठा २२.३५ तर त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा १७.३५ टीएमसी इतका झाला आहे. धरणांतर्गत विभागात पावसाचा जोर ओसरल्याने धरणात सध्या प्रतिसेकंद सरासरी ८,९५२ क्युसेक पाण्याची आवक होत आहे कोयना धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर येथेही पाऊस पडत असल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे.

१०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणात सध्या २२.३५ टीएमसी म्हणजेच एकूण क्षमतेच्या २१.२३ टक्के इतका पाणीसाठा आहे. त्यापैकी उपयुक्त साठा १७.३५ टीएमसी इतका आहे. सध्या जलपातळी ६२८. ११७ मीटरवर असली तरी धरणातील पाणीसाठा लक्षात घेता कोयना चौथ्या टप्प्या मार्फत तयार होणारी वीजनिर्मिती अद्याप बंदच ठेवण्यात आली आहे.

जलपातळी ६३० मीटरच्या वर गेल्यानंतर चौथ्या टप्प्यातून वीजनिर्मिती पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळी पाच ते सोमवारी सायंकाळी पाच या चोवीस तासातील व एक जूनपासूनचा एकूण पाऊस कंसात पुढीलप्रमाणे: – कोयना १२ (८७९ ) मिलिमीटर, नवजा १० ( १२४७) मि.मि., महाबळेश्वर – १० (१३५७) मि. मि. पावसाची नोंद झाली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts