How To Become Millionaire : करोडपती होण्याचे सर्वांचे स्वप्न असते. सर्वजण श्रीमंत होण्यासाठी खूप धरपड करत असतात. अशा वेळी आज आम्ही तुम्हाला करोडपती होण्यासाठी एक स्मार्ट स्ट्रॅटेजी सांगणार आहे. जाणून घ्या…
शेअर बाजारात गुंतवणूक करा
कोरोनानंतर शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. बाजारातील योग्य शेअरमध्ये दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून गुंतवणूक केली, तर गुंतवणूकदाराला नफा मिळण्याची शक्यता जास्त असते, असे मानले जाते.
जर तुम्हाला शेअर बाजाराविषयी फारसे ज्ञान नसेल किंवा तुम्ही जास्त वेळ देऊ शकत नसाल तर म्युच्युअल फंडाच्या माध्यमातूनही शेअर बाजारात गुंतवणूक करता येते.
पोर्टफोलिओमध्ये विविधता आणणे
जर कोणत्याही गुंतवणूकदाराला दीर्घकाळ नफा मिळवायचा असेल तर तो शेअर्ससह रिअल इस्टेट, सोने आणि चांदी इत्यादींमध्ये गुंतवणूक करू शकतो. यामुळे तुम्हाला बाजारातील चढ-उतारांचा कमी त्रास होईल.
लिक्विड फंडात गुंतवणूक करा
लिक्विड फंडातील गुंतवणूक हा नेहमीच फायदेशीर व्यवहार असतो. आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला पैशांची गरज भासल्यास तुम्ही येथून थेट पैसे काढू शकता. यामुळे तुम्हाला तुमची दीर्घकालीन गुंतवणूक अचानक रद्द करावी लागणार नाही आणि तुम्ही मोठ्या नुकसानीपासून वाचाल असाही फायदा होईल.
तुमच्या पोर्टफोलिओमध्ये निश्चित परतावा पर्याय जोडा
FD, RD, PPF, SCSS, NSC आणि सुकन्या समृद्धी योजना इत्यादीसारख्या निश्चित परताव्याच्या गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक करा. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या आर्थिक उद्दिष्टांचे योग्य नियोजन करू शकाल.
EPF मध्ये गुंतवणूक
तुम्ही नोकरी करत असाल तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) मध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करा. यावर सर्वाधिक व्याज मिळते. ही एक सरकारी योजना आहे, जी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) द्वारे चालवली जाते आणि त्यात गुंतवणूक बुडण्याचा कोणताही धोका नाही.
जीवन आणि मुदत विमा
आजच्या अनिश्चित काळात जीवन आणि मुदतीचा विमा घेणे आवश्यक आहे. असे केल्याने तुम्ही कुटुंबाला आर्थिक सुरक्षा देऊ शकता. कठीण काळात तुमच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही.