अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या हस्ते काशी मधील विश्र्वनाथ मंदिराच्या आवारातील विकासकामांचे लोकार्पण केले.
या विकास कामांचा लोकार्पण सोहळा पाहण्यासाठी मोठ्या स्क्रीन ची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमावेळी भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पुण्यातील हडपसर येथील मांजराई देवी मंदिराच्या परिसरात हा कार्यक्रम घेण्यात आला.चंद्रकांत पाटील यांनी यावेळी राहुल गांधी यांना एक आव्हान केले आहे.
राहुल गांधी यांनी आपण हिंदू असल्याचे सांगितले असले तरी हिंदू आणि हिंदुत्व असा त्यांचा संभ्रम झाला असल्याचे पाटील म्हणाले. ते हिंदू असल्याचे सांगतात.
तर त्यांनी मोगलांनी हिंदू मंदिरावर केलेल्या आक्रमणाचा निषेध करावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या प्रमाणे मंदिरांची पुनर्स्थापना करत आहेत.
त्याचप्रमाणे कार्य करण्याचे आव्हान चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना केले आहे.
या कार्यक्रमावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, राहुल गांधी यांचे वक्तव्य त्यांचा संभ्रम दर्शवितो. हिंदू आणि हिंदुत्ववादी यात काय फरक आहे ?
हिंदू धर्म म्हणजे विशिष्ट एकच पूजा पद्धती नाही, तर हिंदू हा गुणवाचक शब्द आहे. जो हिंदू तत्त्वज्ञानाचा आग्रही असतो तो हिंदुत्ववादी असतो.
या देशात हिंदू समाजात वेगवेगळ्या पूजा पद्धती निर्माण झाल्या आणि मंदिरे निर्माण झाली. त्यावर मोगलांनी आक्रमण केले. राहुल गांधी स्वतःला हिंदू म्हणत असतील तर त्यांनी मोगलांनी मंदिरांवर केलेल्या आक्रमणाचा निषेध केला पाहिजे असे चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राहुल गांधी यांना आव्हान केले आहे.