महाराष्ट्र

गार गार पाऊस आणि निसर्गाचे सौंदर्य व आल्हाददायक वातावरणाचा अनुभव घ्यायचा तर ‘या’ ठिकाणांना भेट द्या! मनाला मिळेल शांतता

पावसाळा म्हटलं म्हणजे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा ऋतू आणि या चार महिन्यांमध्ये हिरवाईने नटलेली सगळी सृष्टी पाहण्यामध्ये जो आनंद आहे तो कशातच नाही. पावसाळ्याच्या कालावधीमध्ये भन्नाट प्रवास करत एखाद्या पर्यटन स्थळी भेट देणे व त्या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य डोळ्यात सामावून निसर्गाची लयलूट बघणे म्हणजे खरे स्वर्गसुख असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

पावसाळ्यामध्ये भेट देता येतील अशी खूप काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहेत व ती अशी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये विखुरलेली आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरापासूनचे अंतर आणि बजेट पाहून देखील अशा पर्यटन स्थळांना भेट देण्याची प्लॅनिंग करू शकता.

याचप्रकारे तुम्हाला देखील तुमच्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत या पावसाळ्याचा मनमुराद आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्या परिसरात असलेली इतर पर्यटन स्थळांना भेट देऊ शकतात.

 नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी जवळ हे ठिकाणे पहा आणि निसर्गाचा आनंद घ्या

1- विहिगाव धबधबा पावसाळ्यामध्ये जर तुम्हाला या परिसरात धबधबा पाहायचा  असेल तर विहीगाव धबधबा हा एक सुंदर निसर्गाचा देखावा पर्यटनासाठी उत्तम पर्याय ठरेल. पावसाळ्याच्या कालावधीमध्ये हा परिसर पूर्णपणे हिरवाईने नटलेला असतो

व या ठिकाणाचे निसर्गाचे सौंदर्य हे पाहण्यासारखे असते. विहिगाव धबधब्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या आजूबाजूला उंच उंच पर्वत आणि जंगल परिसर असून त्यामधून 120 फूट उंचावरून हा धबधबा खाली कोसळतो.

2- कळसुबाई शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेले शिखर म्हणून कळसुबाई शिखर ओळखले जाते. कळसुबाई शिखर हे चढाई करण्यासाठी खूपच गुंतागुंतीचे व अवघड आहे.

त्यामुळे या ठिकाणी जर तुम्हाला चढाई करायची असेल तर अनुभव असल्याशिवाय उगीचच धाडस करू नये. कळसुबाई शिखराचा परिसर देखील निसर्गाने नटलेला असून या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासारखे आहे.

3- भावली धरण नाशिक पासून 50 किलोमीटर आणि मुंबईपासून 120 किलोमीटर अंतरावर भावली धरण असून हे धरण पाहण्यासाठी तुम्हाला शंभर पायऱ्या चढून वर जावे लागते.

भावली धरणाचे वैशिष्ट्ये म्हणजे त्याची लांबी पाच हजार नव्वद फूट असून त्यामुळे हे पर्यटकांसाठी एक विशेष पाहण्यासारखे ठिकाण आहे. भावली धरण पाहिल्यानंतर तुम्ही या ठिकाणी अनेक सुंदर अशी पिकनिक स्पॉट्स पाहू शकतात.

4- सांधण व्हॅली पर्वतरांगांमधील जे काही अंतर आहे त्यामुळे निर्माण झालेली सांदण व्हॅली हे ठिकाण निसर्गाने नटलेले असून त्याचे स्वतःचे असे वैशिष्ट्य आहेत. कोणत्याही कालावधीत तुम्ही या ठिकाणी फिरायला जाल तरी या ठिकाणी तुम्हाला उत्तम असा निसर्ग सौंदर्याचा आनंद घेता येतो.

या ठिकाणी कोणतेही व्यक्ती पोहोचू शकत नाही. शारीरिक दृष्ट्या फिट आणि मजबूत पर्यटक,ट्रेकिंगची आवड आहे तेच या ठिकाणी जास्त अंतर पार करू शकतात. इगतपुरी पासून जवळपास 70 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.

5- त्रिंगलवाडी किल्ला हा किल्ला जमिनीपासून तब्बल 3000 मीटर उंचीवर असून या किल्ल्यावर गेल्यावर कोकण ते नाशिक हायवे खूप सुंदर दिसतो. साधारणपणे या किल्ल्याचे बांधकाम 10 व्या शतकातील असून हा पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरतो.

तुम्हाला पर्वतामध्ये गिर्यारोहण किंवा ट्रेकिंग करण्याची आवड असेल तर त्रिंगलवाडी किल्ला हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. त्रिंगलवाडी  किल्ला तुम्ही पाहिला तर हा पगडीसारखा दिसतो. त्रिंगलवाडी किल्ला पाहिल्यानंतर तुम्ही या ठिकाणी असलेला त्रिंगलवाडी तलाव देखील पाहू शकता.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts