Hill Station:- रिमझिम पावसामध्ये मनसोक्त भटकायला जाणे आणि एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी असलेल्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेणे व जीवनातील दररोजच्या ताणतणावापासून स्वतःची मुक्तता करणे हे खूप महत्त्वाचे असते व याकरिता पावसाळ्याचा कालावधी हा बेस्ट कालावधी असतो.
महाराष्ट्र मध्ये पावसाळ्यात असे अनेक ठिकाणे आहेत की ती निसर्ग सौंदर्याने भरलेली असतात व त्या ठिकाणी हजारोंच्या संख्येने पर्यटक भेट देत असतात. पावसाच्या कालावधीमध्ये रिमझिम पावसाचा आनंद घेत निसर्गाचे अनुभूती अनुभवण्याकरिता निसर्ग सौंदर्य ठिकाणी तसेच सुंदर अशा हिल स्टेशनला बरेच जण भेट देतात.
अगदी तुम्हाला देखील या पावसाळ्यामध्ये एखाद्या हिल स्टेशनला भेट द्यायची असेल तर तुम्ही पाचगणी या महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील थंड हवेच्या ठिकाणी भेट देऊ शकता.
पाचगणी आहे पाच डोंगरांच्या समूहावर वसलेलं निसर्गरम्य ठिकाण
पश्चिम महाराष्ट्राला निसर्गाने भरभरून दिले आहे आणि त्यातल्या त्यात सातारा जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर या ठिकाणी अनेक निसर्गाने नटलेली ठिकाणी आहेत व या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण पाचगणी हे देखील आहे. महाबळेश्वर पासून 18 ते 20 किलोमीटर अंतरावर पाचगणी असून हे ठिकाण पाच डोंगरांच्या समूहावर विकसित झाले असल्याने त्याला पाचगणी असे म्हणतात.
महाबळेश्वर इतकेच निसर्गाने संपन्न असलेले हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे व त्या ठिकाणी पारशी लोकांनी जुन्या काळात बांधलेले बंगले आज देखील लक्षवेधी ठरतात.
पाचगणीला आमराळ, खिंगर, गोडवाली, मंदार देव आणि दांडेघर या पाच टेकड्यांनी वेढलेले आहे. पाचगणीचा शोध 1960 च्या दशकामध्ये ब्रिटिशांनी लावला व हे ठिकाण अधिकाऱ्यांसाठी एक महत्त्वाचे ठिकाण होते व उन्हाळी राजधानी म्हणून ते समजले जायचे. ब्रिटिश येथे सुट्टी लावण्यासाठी येत असत.
पाचगणी आहे हिरवाईने नटलेले रमणीय ठिकाण
महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या सुंदर डोंगररांगांमध्ये हे एक सुंदर हिल स्टेशन वसले असून या ठिकाणच्या हिरवाईने नटलेल्या हिरव्यागार टेकड्या तसेच खोलच खोल दरी आणि खळखळणारे धबधबे पावसाळ्यामध्ये पाहण्यात अनन्यसाधारण असा आनंद मिळतो. या ठिकाणाचे अल्हाददायक हवामान आणि सुखद वातावरण देखील पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.
पाचगणीला हायकिंग, ट्रेकिंग आणि पॅराग्लायडिंग सारख्या विविध साहसी ऍक्टिव्हिटीज देखील तुम्हाला करता येतात. पाचगणीला ब्रिटिशकालीन इमारती आणि प्राचीन मंदिरे देखील असून या माध्यमातून तुम्हाला त्या कालावधीतील समृद्ध इतिहास आणि संस्कृती जवळून अनुभवता येते.
पाचगणीला जा परंतु ही ठिकाणी पहा
1- टेबल लँड– टेबल लँड हे पाचगणी शहरातील सर्वात उंच पठार म्हणून ओळखले जाते व या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणावर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी गर्दी करतात.
2- कमलगड किल्ला– कमलगड किल्ला हा खडकांनी वेढलेला असून एक रहस्यमय किल्ला म्हणून ओळखला जातो.
3- सिडनी पॉइंट– हे एक पाचगणी मधील प्रमुख प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून पाचगणी पासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. कारण तुम्हाला कृष्णा नदी तसेच कृष्णा नदीचे खोरे व कमळगड किल्ला, वाई शहराचे दर्शन घेता येते.
4- पंचगंगा मंदिर– पाचगणी मधील हे एक अतिशय प्रसिद्ध मंदिर असून पर्यटकांमध्ये खूप आकर्षणाचे ठिकाण आहे.
5- प्रतापगड किल्ला– प्रतापगड किल्ला पाचगणी पासून 40 किलोमीटर अंतरावर असून छत्रपती शिवाजी राजांच्या समृद्ध इतिहासाची साक्ष म्हणजेच प्रतापगड किल्ला आहे.
6- वेण्णा तलाव– पाचगणी पासून 20 किलोमीटर अंतरावर वेन्ना तलाव असून ज्यांना कुणाला बोटिंग किंवा मासेमारी करायची असेल त्यांनी वेन्ना तलावाला अवश्य भेट द्यावी.