अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- युवक कॉंग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी शासकीय जाहिरातींमध्ये फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांचे फोटो दिसतात. अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
त्या नाराजीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सत्यजीत तांबे नाराज असतील तर त्यांची समज काढण्यात येईल.
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख ऊद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुढील पाच वर्ष हे सरकार स्थिर राहणार आहे. अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com