अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Ahmednagar crime:-लग्नानंतर विवाहितेला माहेराहून 5 लाख रुपये आणावेत यासाठी सासरच्या मंडळींकडून त्रास सुरु झाला.
याप्रकरणी विवाहिता कांचन आशिष जमधडे (वय 25) रा. कृष्णानगर चिंचवड ता. हवेली जि. पुणे, हल्ली रा. सलाबतपूर ता. नेवासा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये आशिष बलभिम जमधडे, बलभिम पुंजाजी जमधडे, अनिता बलभिम जमधडे, सुरज बलभिम जमधडे, (चौघेही रा. कृष्णानगर, चिंचवड ता. हवेली जि. पुणे), अशोक पुंजाजी जमधडे व राजेंद्र अशोक जमधडे (दोघे रा. वाघोली ता. शेवगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, 21 जुलै 2017 फिर्यादी ही तिच्या सासरी नांदत असताना तिने तिच्या माहेरहुन 5 लाख रुपये आणावेत या कारणांकरीता
तिला शारिरिक मानसिक त्रास देवून मारहाण, शिवीगाळ करुन उपाशी पोटी ठेवले. या बाबत फिर्यादीच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.