समाजात अनेक गुन्हेगारी घटना घडताना दिसतात. गोरगरिबांना लुटून स्कॅम करणारे आजवर अनेक गुन्हे उघडकीस आले.
परंतु आता जो १०० कोटींचा घोटाळा उघडकीस आला आहे गोर गरीब जनतेस महिन्याला दोन ते तीन टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवत व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनी आणि ग्लोबल एफिलेट बिझनेस या कंपन्यांच्या माध्यमातून १०० कोटी गोळा केले.
हा सर्व पैसा हवाला रॅकेट व शेल कंपन्यांच्या मार्फत विदेशात देखील पाठवण्यात आला. परंतु काही गोष्टींत ते अडकले व ईडीचे छापे पडले व त्यानंतर सगळा प्रकार समोर आला. विशेष म्हणजे याचे पाळेमुळे अहमदनगर पुणे जिल्ह्यात आहेत.
हा सर्व प्रकार २०२० पासून घडत असून आजतागायत हे सुरूच होते. विनोद तुकाराम खूटे, संतोष तुकाराम खूटे, किरण पितांबर अनारसे, मंगेश सिताराम खूटे, अजिंक्य बडधे आदी आरोपी यात आहेत. यातील अनेकांची नावे तुम्ही ऐकली असतील. कारण अल्पावधीत खूप पैसे कमवता येतो असे हे सांगत असल्याने तरुणांमध्ये हे जास्त प्रसिद्ध झाले होते.
व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनी , ग्लोबल एफिलेट बिझनेस यांसह ‘फॉरेस्ट ट्रेडिंग’च्या नावाखाली ‘काना कॅपिटल’ कंपनी बनवून त्याद्वारेही करोडो रुपयांचा गंडा घालण्याचा गोरख धंदा सुरु होता. विशेष म्हणजे हे सगळे धंदे कंपनीचे संचालक दुबईमध्ये बसून करत होते.
बनावट कंपन्यांची स्थापना – आरोपींनी २०२० साली व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनी, ग्लोबल एफिलेट बिझनेस कंपन्यांची सुरवात केली. यातून सर्व सामान्यांना दरमहा दोन ते तीन टक्के व्याजदराने परतावा देऊ असं अमिश दाखवलं. चेन मार्केटिंग सिस्टम वापरली. यातून करोडो रुपये गोळा केले. लोकांनी जे पैसे गुंतवले ते बँकेतील बनावट खात्यात घेतले.
आलिशान गाड्या, घरे, कमिशनचे आमिष :- गुंतवणूकदारांना कमिशनचे आमिष दिले. जास्तीच्या कमिशनसाठी आणखी गुंतवणूकदार आणायला भाग पाडले. लोकांना टार्गेट दिली. टार्गेट पूर्ण केल्यास महागडी घरे, आलिशान गाड्या, बोनस, हॉलिडे मेंबरशीप देण्याचे प्रलोभने दिली. अशा पद्धतीने लोकांचा कष्टाचा पैसे गोळा केला व करोडोंची माया जमवली.
विनोद खुटे याची काना कॅपिटल कंपनी :- विनोद खुटे याने ‘फॉरेस्ट ट्रेडिंग’च्या नावाखाली ‘काना कॅपिटल’ नावाची कंपनी सुरु केली. ‘झूम’ मिटिंग घेत कॉर्पोरेट चा आव आणला. बनावट फर्म तयार केले. पैसे गोळा केले व फॉरेस्ट ट्रेडिंग सुरु केली. काही दिवस शांततेत गेली व अचानक ‘काना कॅपिटल’ या कंपनीचे कामकाज बंद केले गेले. अशा पद्धतीने विविध कंपन्या आणि बनावट खात्यांच्या माध्यमातून गोळा केलेले १०० कोटी पेक्षा जास्त असणारे पैसे हवाला रॅकेटच्या माध्यमातून भारताबाहेर देखील पळविले.
पुणे आणि अहमदनगरमध्ये ईडीचे छापे :- अंमलबजावणी संचालनालयान अर्थात ईडीने जून महिन्यात पुणे आणि अहमदनगरमधील ‘व्हीआयपीएस ग्रुप’ आणि ‘ग्लोबल एफिलिएट बिझनेस’च्या केंद्रांवर धाडी टाकल्या. १८ कोटीची मालमत्ताही जप्त केली. या घोटाळ्याचा ‘मास्टरमाइंड’ विनोद खूटे निघाला. तोच हे फसवणुकीचे रॅकेट दुबईमध्ये बसून चालवीत होता.
मोबाईल ऍपद्वारे फसवणूक :- या बिझनेस साठी त्याने एक मोबाईल अँप बनवले. गुगल प्ले स्टोअरच्या माध्यमातून हे अँप डाऊनलोड तो करायला लावायचा. पुढील सर्व व्यवहार या अँप वरूनच व्हायचे. हे गुगल प्ले स्टोअर व अँपल स्टोअरवर उपलब्ध असलेल्या ‘ग्लोबल एफिलिएट बिझनेस’ नावाच्या ऍपद्वारे करण्यात आले. याद्वारे तो अनधिकृतरित्या मल्टी-लेव्हल मार्केटिंग (एमएलएम) स्कीम चालवत होता.
पुण्यात मेसर्स डी धनश्री मल्टी-स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी :- विनोद खुटे या आरोपीने पुण्यात मेसर्स डी धनश्री मल्टी-स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड सुरू केली होती. येथे जर पैसे ठेवले तर गुंतवणूकदारांना चार टक्के मासिक व्याज देऊ अशा स्कीम त्याने आणल्या होत्या.