महाराष्ट्र

आगामी दीड वर्षांत नोकऱ्याच नोकऱ्या, मोदी सरकार देणार १० लाख नोकऱ्या

Maharashtra news : पुढील दीड वर्षांत १० लाख जणांना सरकारी भरती करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. मंगळवारी सकाळी पीएमओ कार्यालयाकडून ट्वीट करण्यात आलं आहे.

या ट्विटमध्ये ही घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील मानव संसाधन स्थितीचा आढावा घेतला. त्यामध्ये या सूचना देण्यात आल्या आहेत. हे काम मिशन मोडमध्ये करण्यात येणार आहे.

दरम्यान आज लष्कर भरतीसंबंधीही मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रमुख एकत्रित प्रेस कॉन्फरन्स करून लष्कर भरती संदर्भात घोषणा करणार आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts