अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- कीर्तनातून सामाजिक, राजकीय क्षेत्रातील ज्वलंत विषयांवर भाष्य करून अनेकांची मनं जिंकणारे कीर्तनकार म्हणून निवृत्ती इंदुरीकर महाराजांना ओळखले जाते.
त्यांच्या एका कीर्तनातील वक्तव्यास आक्षेप घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह अन्य पुरोगामी संघटनांनी महाराजांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
संगमनेर कोर्टात गुन्हा दाखल झाल्यानंतर आज इंदोरीकर महाराजांना कोर्टात हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. आता इंदोरीकर महाराज आज कोर्टात हजर राहणार का? आणि आपली काय बाजू मांडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
इंदुरीकर महाराजांचे ‘ते’ वक्तव्य कुठे आणी कधी केले याबाबत कुठलाही पुरावा नसल्याचं कारण देत मार्च महिन्यात अहमदनगर जिल्हा प्रशासनाने गुन्हा दाखल केला नव्हता.
परंतु अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे यांनी याबाबत मात्र पाठपुरावा करून संबंधित प्रकरणाचे पुरावे जिल्हा आरोग्य विभागाला दिल्यानंतर 26 जुन रोजी संगमनेर कोर्टात जिल्हा आरोग्य प्रशासनाने इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
त्या प्रकरणी संगमनेर कोर्टाने इंदुरीकर महाराज यांना समन्स बजावले असून आज कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिलेला आहे.
काय म्हणाले होते इंदुरीकर महाराज?
‘स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात.
जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब होते.’ असे ते म्हणाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved