खोटे उत्पन्न दाखवून रेशनकार्डवरील धान्य उचल हा कायदेशीर गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- शहरातील सर्व शिधापत्रिकाधारकांना कळविण्यात येते की, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत पुढे दिलेल्या निकषात समाविष्ट असणारे शिधापत्रिकाधारक हे रेशन घेण्यास अपात्र आहेत.

खोटे उत्पन्न दाखवून रेशनचे धान्य उचल करणे हा कायदेशीर गुन्हा आहे याची रेशनकार्ड धारक यांनी नोंद घ्यावी. रेशन घेण्यास अपात्र रेशनकार्डधारक- केंद्र व राज्य सरकारी सर्व खात्यातील कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी यांचे एकत्र कुटूंबातील सदस्य उदा. रेल्वे, संरक्षण, पोस्ट इत्यादी,

नगरपालिका, महानगरपालिका कर्मचारी, अनुदानित विना अनुदानित महाविद्यालयातील कर्मचारी प्राध्यापक शिक्षक व इतर कर्मचारी, सधन कुटूंबातील सदस्य आयकर भरणारे, चारचाकी वाहन वापर करणारे कार्डधारक, कोतवाल, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच (अपवाद वगळता).

सदर कर्मचारी व रेशन कार्ड धारक यांनी रेशनचे धान्य घेतल्याचे पुराव्यानिशी दिसून आल्यास फौजदारी गुन्हा व बाजारभावाप्रमाणे उचल केलेल्या धान्याची वसुली केली जाईल याची नोंद घ्यावे, असे अन्नधान्य वितरण अधिकारी अभिजीत वांढेकर यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts