Maharashtra News : मराठा समाजाचे अनेक वर्षे प्रलंबित असलेले प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनीच मुख्यमंत्रीपदाच्या काळात मार्गी लावले आहेत. आता उपमुख्यमंत्रीपदाच्या काळात फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयांचा मराठा समाजातील हजारो विद्यार्थी आणि तरुणांना फायदा झाला आहे. असे भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे सांगितले.
पाचपुते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला मोठा निधी दिला गेला. या महामंडळाकडून आतापर्यंत सुमारे ५ हजार कोटींचे कर्ज वाटप झाले असून ६७ हजार तरूणांना याचा फायदा झाला आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना भाजपा सरकारच्या काळात व श्री फडणवीस यांच्याच मुख्यमंत्रीपदाच्या काळात सुरू झाली आहे. त्याचा फायदा ५८ हजारांहून अधिक मराठा विद्यार्थांना झाला आहे. २०२२ पर्यंत या योजनेत ५०० कोटींहून अधिक रक्कम खर्च करण्यात आली आहे.
सारथी संस्थेमार्फत आतापर्यंत सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांना ४४. ५८ कोटी रुपये खर्च करून स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण देण्यात आले. रोजगार व स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवून २७ हजार ३४७ मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला.
एमफील व पीएचडीसाठी २१०९ विद्यार्थ्यांना लाभ दिला आहे. सरकारतर्फे प्रति विद्यार्थी २० लाख रुपये पाच वर्षांसाठी फेलोशीपसाठी अनुदान दिले जाते ‘युपीएससी’च्या तयारीसाठी मराठा समाजातील ५०० मुलांसाठी दरवर्षी दिल्ली व पुणे येथे प्रशिक्षण देण्यात येते.
युपीएससीत ५१ उमेदवार तर वर्ग १ व वर्ग २ अशा एकूण ३०४ मराठा समाजातील विद्यार्थ्यांची एमपीएससीमार्फत निवड झाली आहे, असेही पाचपुते यांनी सांगीतले.
ठाकरे- पवार सरकारच्या काळात सारथीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांनी उपोषण करावे लागले होते. याची आठवण पाचपुते यांनी करून देत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसीप्रमाणे शैक्षणिक सवलती, सुविधा दिल्या जातात.
९ वी ते ११ वीतील विद्यार्थ्यासाठी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली असून आतापर्यंत २३ हजार २२४ विद्यार्थ्यांना ३१.२३ कोटी रुपये देण्यात आल्याचे सांगितले.