यावर्षी झालेल्या अति पावसामुळे कडाक्यांची थंडी पडणार आणि दीर्घकाळ राहणार, असा अंदाज प्रत्येकाच्याच तोंडी सध्या ऐकायला मिळतो आहे. तो खरा ठरणार आहे. यंदा महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत कडाक्याची थंडी पडणार आहे.
मात्र, ही केवळ आपल्याकडे झालेल्या पावसाचा परिणाम नाही तर प्रशांत महासागरात तयार झालेल्या ला-नीना प्रवाहाचीही त्यात भर पडणार आहे.
आपल्याकडील पाऊस आता थांबला आहे. मॉन्सूनही परत गेला आहे. तर तिकडे प्रशांत आणि हिंदी महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान खाली आले आहे. या प्रक्रियेला ली-नीना म्हणतात.
यावेळी ही प्रक्रिया नेमकी हिवाळ्यात घडत असल्याने त्याचा परिणाम होऊन महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कडाक्याची थंडी पडणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
येत्या काही दिवसांतच थंडीचा कडाका वाढणार आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीसह फेब्रुवारीतही राज्यात थंडीचा जोर कायम राहील. समुद्रातील स्थिती मार्चपर्यंत राहणार असल्याने तोपर्यंत थंडी जाणवत राहण्याचा अंदाज आहे.