महाराष्ट्र

‘महाराष्ट्र अभी बाकी हैं’ बोलणाऱ्यांना जयंत पाटलांचे उत्तर; म्हणाले, उत्साहाच्या भरात…

मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे (Assembly Election Result 2022) निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपने (Bjp) विरोधकांना चांगलेच ठणकावले आहे.

तसेच या निवडणुकीत भाजपला चार राज्यामध्ये सत्ता कायम राखली आहे. त्यामुळे राज्यातल्या आणि देशातल्या भाजप नेत्यांचा (Bjp) आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे.

कालपासून भाजप नेत्यांनी ये तो सिर्फ झाकी हैं, महाराष्ट्र अभी बाकी हैं, म्हणत आता महाराष्ट्र (Maharashatra) मध्ये सत्ता निर्माण करण्याचा उद्देश आहे. तसेच मुंबईकडे (Mumbai) बोट करत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला इशारा दिला आहे.

भाजपच्या या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी माध्यमांशी बोलताना भाजपला सूचक इशारा दिला आहे.

जयंत पाटील यावेळी म्हणाले, ये तो सिर्फ झाकी हैं, महाराष्ट्र अभी बाकी हैं असे बोलणे चुकीचे आहे, महाराष्ट्राची मानसिकता वेगळी आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला धोका नाही असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

तसेच भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करायला हरकत नाही, परंतु भाजपमधील लोकांवरही कारवाई व्हावी. आम्ही भाजपची यादी दिली आहे. यामुळे कारवाई व्हावी असे जाहीर आव्हानही जयंत पाटील यांनी दिले.

देश चालवायची जी चुकीची पद्धत आहे, त्याचा विरोध करायला हवा त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला हवे असे आवाहनही जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना केले आहे.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts