महाराष्ट्र

किरीट सोमय्या म्हणाले… मंत्रालय ही कोणाच्या बापाची मालकी नाही

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :-   भाजप नेते किरीट सोमय्या हे ठाकरे सरकारवर टीका करण्यात नेहमीच आघाडीवर असतात. आता सोमय्या मंत्रालयातील त्या फोटोवरून चर्चेत आलेत.

मंत्रालयात माझा फोटो काढण्यासाठी जो माणूस आला होता, उद्धव ठाकरेंचा माणूस होता, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या काही दिवसांपूर्वी मंत्रालयात गेले होते. त्यावेळी त्यांनी नगरविकास खात्याच्या विभागाला भेट दिली होती.

यावेळी एका अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून ते फायली चाळत होते. याबद्दलचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, या फोटोमध्ये नगरविकास विभागाचे अधिकारी हे उभे असल्याचे दिसत आहे. संबंधित फोटो व्हायरल झाल्यानंतर सोमय्या यांना दोन दिवसात या प्रकरणाता खुलासा करण्याची नोटीस बजावण्यात आली.

याच नोटीसीवरुन किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टोकाच्या शब्दांमध्ये टीका केली. “माझी उद्धव ठाकरे यांना विचारणा आहे की, माझ्यावर गुन्हा कधी दाखल करणार?

माझा दोष काय म्हणे तर मी सरकारी खुर्चीत कसा बसलो. तुमचं खोटं पकडलं म्हणून तुम्ही कर्मचाऱ्सांना लिपिकाला नोटीस बजावता? हिम्मत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा. नाहीतर त्या लिपिक परीवाराची माफी मागा. ज्यांनी फोटो घेतले त्यांना नोटीस बजवायची की जे विक्टीम आहेत त्यांना नोटीस बजावायची?

माझा दावा आहे की, उद्धव ठाकरे यांना माहिती आहे की. फोटो कोणी काढले. ही नोटीस कोणत्या कायद्या अंतर्गत बजावली? ही तर दादागिरी आहे”, अशी शब्दांत किरीट सोमय्या यांनी रोष व्यक्त केला. “मंत्रालय ही कोणाच्या बापाची मालकी नाही.

ठाकरे सरकारने महाराष्ट्राला लुटायचे आणि ते उघडकीस आणले की असे वागायचे. मी पोलीस ठाण्यासह सर्व विभागातील सचिवांना तक्रार दिली आहे.

इतकेच नाही तर ज्यांनी मला नोटीस बजावली ते अधिकारी शिंदेंनाही मी विचारले आहे, तुम्ही माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन केले आहे”, असंही ते यावेळी म्हणाले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts