राष्ट्रवादीकडून कोतकर तर शिवसेनेकडून गाडे निवडणुकीच्या रिंगणात

4 years ago

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर यांनी आज राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.

शिवसेनेकडून योगीराज गाडे यांनी अर्ज दाखल केला आहे. कोतकर यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत भाजपला मोठा धक्का दिला.

कोतकर हे सभापतीपदासाठी भाजपकडून निवडणूक लढणार होते. परंतु ऐनवेळी कोतकर यांनीच भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

भाजपा स्थायी समितीच्या सभापती पदासाठी इच्छुक होता. त्यासाठी राज्य पातळीवरून सूत्रे हलवत होती. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.

परंतु ऐनवेळी कोतकर यांनी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने भाजपची कोंडी झाली आहे. स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी उद्या शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मतदान होणार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Recent Posts