Maharashtra News : महाराष्ट्रातील वातावरण आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलेच ढवळले आहे. मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्रभर दौरे करत मराठा जनतेशी चर्चा करत आहेत. आता शिंदे सरकारने दिलेली अंतिम तारीख जावळ आली आहे.
दरम्यान आता अटकेच्या व गुन्हे मागे घेण्याच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे.
ते म्हणाले आहेत की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दाला आम्ही सन्मान दिला, गृहमंत्र्यांच्या शब्दालाही किंमत दिली. परंतु आम्ही या गोष्टी करूनही गुन्हे मागे घेतले नाहीत. आता अटकेचा डाव आहे का?
परंतु मला अटक करणं एवढं सोपं नाही. जर अटक झाली तर मग त्यांना पुढे कळेल काय असते ते. अटकेला आम्ही भीत नाही, फक्त अटक करा, भिंतीवरून उडी टाकील. आंदोलन हाताळायचे शिका, दाबायला शिकू नका,’ असा इशाराच त्यांनी दिलाय.
* कुठेही जातीय तणाव निर्माण करायचा नही
चौथ्या दौरा हा मराठा समाजाच्या गाठीभेटी घेण्यासाठी आहे. सर्वत्र शांततेचे आवाहन करण्यासाठी, जातीय तणाव करायचा नाही असे आवाहन करण्यासाठी आहे असे ते म्हणाले. २४ डिसेंबरला नेमकं काय करायचं ते १७ डिसेंबर रोजी आम्ही मराठा समाजाची बैठक घेऊन ठरवणार आहोत असे ते म्हणाले.
माजलगावचा आमदार (प्रकाश सोळुंके) इकडे येतो, गोड बोलतो, कॉलेजमध्ये बसून तुम्ही यादी बनवायला लागला आणि व्हिडिओ द्यायला लागलाय. दोषी नसणारे लोक तुम्ही गुंतवायला लागलाय. गुन्हे मागे घेतो म्हणले तरीही लोक अटक केले जात आहेत.
सरकार डाव टाकतेय. सरकार २४ डिसेंबरच्या आत निर्णय घेत असेल व गुन्हे मागे घेतले तरच तुमचं आमचं जमल, असाही इशारा जरांगे यांनी दिला.