LIC Jeevan Tarun Yojna : मध्यमवर्गीय लोक मोठ्या प्रमाणात नोकरी करत असतात. अशा वेळी पगारातील थोडा पैसा ते पॉलिसीमध्ये गुंतवत असतात. याचा फायदा त्यांना कालांतराने होत असतो.
दरम्यान, आज आम्ही तुम्हाला LIC च्या जीवन तरुण योजनेबद्दल सांगणार आहे. तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता. जेणेकरुन तुम्ही भविष्याच्या चिंतेतून मुक्त व्हाल.
LIC जीवन तरुण योजना काय आहे?
या विमा पॉलिसीसाठी, तुमच्या मुलाचे किमान वय 90 दिवस आणि कमाल वय 12 वर्षे असले पाहिजे, तरच तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकाल. या प्लॅनमधील मुख्य गोष्ट अशी आहे की तुम्हाला मुलाचे 20 वर्षे पूर्ण होईपर्यंतच यासाठी प्रीमियम भरावा लागेल.
यानंतर, मुलाचे वय 25 वर्षे पूर्ण झाल्यावर, तुम्हाला मॅच्युरिटी रक्कम मिळण्यास सुरुवात होईल. या पॉलिसीमध्ये तुम्हाला 125 टक्के सम अॅश्युअर्ड बेनिफिट देखील मिळत राहतील. LIC ची जीवन तरुण पॉलिसी मुलाची 25 वर्षे पूर्ण झाल्यावर परिपक्व होईल. या पॉलिसीमध्ये, तुम्हाला किमान 75,000 विमा रक्कम मिळू शकते.
तुम्हाला किती परतावा मिळेल?
या पॉलिसीमध्ये परिपक्व होण्यापूर्वी मुलाच्या पालकाचा मृत्यू झाल्यास, त्याला कोणत्याही प्रकारचा प्रीमियम भरावा लागणार नाही. 25 वर्षांचा झाल्यावर त्याला पॉलिसीची संपूर्ण रक्कमही मिळेल. जर तुम्ही या पॉलिसीमध्ये दररोज 150 रुपये गुंतवले आणि दरमहा 4,500 रुपये गुंतवले.
म्हणजेच एका वर्षात तुम्ही 54,000 रुपये गुंतवाल. त्यामुळे वयाच्या 0 व्या वर्षी ही पॉलिसी घेतल्यास, तुम्हाला एकरकमी 26 लाख रुपये मिळतील. त्यामुळे अधिकाधिक लोक या योजनेत गुंतवणूक करत आहेत जेणेकरून त्यांना भविष्यात आपल्या मुलांची चिंता करावी लागणार नाही.