अहमदनगर लाईव्ह24 टीम :- ऐतिहासिक, धार्मिकस्थळ म्हणून ओळख असणारे डोंगरगण गाव व परिसर प्रेमीयुगुलांसाठी लव्हर पॉइंट बनले आहे. या ठिकाणी सुरू असणार्या अश्लील चाळ्यांचा त्रास स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे. यामुळे या ठिकाणी पोलिसांनी संबंधित प्रेमीयुगुलांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
नगर-वांबोरी रोडवर असणार्या डोंगरगण गाव हे धार्मिकदृष्टीने महत्त्वाचे गावा आहे. या ठिकाणी सीतेची नहाणी, रामेश्वर हे भगवान शंकराचे मंदिर आहे. या ठिकाणी वर्षभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते.
श्रावण महिन्यात महिनाभर या ठिकाणी भाविकांची वर्दळ असते. या भागातील निसर्ग अतिशय समृद्ध असल्याने मोठ्या संख्येने या ठिकाणी पर्यटक आकर्षित होतात. नगर शहरापासून हे ठिकाण अवघ्या 15 किमी अंतरावर असल्याने या ठिकाणी सहज कोणीही पोहचू शकते.
मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात प्रेमीयुगुलांची संख्या वाढली आहे. त्यामध्ये कॉलेज तरुण तरुणींची संख्या जास्त आहे. डोंगर टेकडी, खोल दरी, घनदाट जंगल यामुळे एकांत मिळतो.
अशा वातावरणात प्रेमीयुगुलांची अश्लील चाळे सुरु असतात. त्याचा परिणाम येथे येणार्या पर्यटकांवर देखील होत आहे. ऐतिहासिक वस्तूंवर नावे टाकून विद्रुपीकरण करण्यात येत आहे.
डोंगरगण शेजारी गोरक्षनाथ गड, मांजरसुंबा गड, वांबोरी घाट परिसरात प्रेमीयुगुलांची वर्दळ दिसून येते.डोंगरगण परिसरात प्रेमीयुगुल तसेच पर्यटकांना अडवून ब्लॅकमेल, लुटण्याचे प्रकार यापूर्वी घडलेले आहेत. टारगट प्रेमीयुगुलांकडून स्थानिकांना शिवीगाळ दमबाजी करण्यात येत असल्याने डोंगरगण ग्रामस्थांना हकनाक मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com