महाराष्ट्र

खुशखबर ! महाराष्ट्रातील ‘या’ विद्यार्थ्यांना आता गणवेश, बूट, पीटी ड्रेस खरेदीसाठी मिळणार 2642 रुपये ; GR वाचा

Maharashtra Breaking : मित्रांनो खरं पाहता शासकीय वसतिगृहे, शासकीय निवासी शाळांमध्ये मागासवर्गीय प्रवर्गातील असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी समाज कल्याण विभागामार्फत वेगवेगळ्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी योजना कार्यान्वित केल्या जातात. शासकीय निवासी शाळांमध्ये तसेच शासकीय वस्तीगृहांमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना भोजनाची तसेच इतर सोयीसुविधा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून दिल्या जातात. मित्रांनो आतापर्यंत शासकीय निवासी शाळा मधील विद्यार्थ्यांना गणवेश, बूट अशा शालोपयोगी वस्तू थेट लाभ म्हणून दिल्या जात होत्या.

मात्र आता यामध्ये धोरणात्मक बदल केला गेला आहे. आता संबंधित विद्यार्थ्यांना गणवेश बूट रेनकोट पी टी ड्रेस यांसारख्या वस्तू खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. म्हणजेच आता विद्यार्थ्यांच्या खात्यात सदर शालोपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी थेट पैसा जमा होणार आहे.

मित्रांनो शासकीय निवासी शाळांमध्ये, शासकीय वस्तीगृहामधील विद्यार्थ्यांना आता बूट, गणवेश खरेदी करण्यासाठी त्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यावर 2642 रुपयांचे अनुदान वितरित केले जाणार आहे. यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय 9 नोव्हेंबर 2022 रोजी घेण्यात आलेला आहे.

मित्रांनो खरं पाहता, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळातील विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार साहित्य खरेदी करण्यास मुभा मिळावी व खरेदीमध्ये पारदर्शकता राहण्याच्या दृष्टीने आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, पुणे दिनांक ११.२.२०२२ च्या पत्रान्वये सादर केलेल्या प्रस्तावास अनुसरून सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळातील विद्यार्थ्यांना वस्तू स्वरूपात मिळणाऱ्या लाभाचे हस्तांतरण रोख स्वरूपात (DBT) लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या अनुषंगाने आता विद्यार्थ्यांना अनुदान देणे हेतू महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. सदर शासन निर्णयाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला 2642 रुपयांचे अनुदान मिळणार आहे.

शासन निर्णय सविस्तर खालीलप्रमाणे :-

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत शासकीय वसतीगृहे व शासकीय निवासी शाळातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांबाबत नमूद विविध वैयक्तिक लाभाकरीता निश्चित केलेली रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावी. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की सदर शासन निर्णयाच्या माध्यमातून शासकीय वसतीगृहे व शासकीय निवासी शाळातील विद्यार्थ्यांना बूट, शालेय गणवेश, पीटी गणवेश आणि रेनकोट घेण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे.

यामध्ये बूट घेण्यासाठी विद्यार्थ्याला 285 रुपयाचे अनुदान, शालेय गणवेश घेण्यासाठी 926 रुपये, पीटी गणवेश घेण्यासाठी 945 रुपये, रेनकोट घेण्यासाठी 491 रुपये एवढी रक्कम विद्यार्थ्यांच्या बँकेत खात्यात सरळ ट्रान्सफर केली जाणार आहे. यामुळे सहाजिकच विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करताना मदत होणार आहे. शिवाय यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी देखील मदत होणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts