Maharashtra Havaman Andaj : यंदा महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस उशिरा दाखल झाला असला तरी तो जुलै महिन्यामध्ये मुसळधार कोसळला आहे. तसेच अजूनही महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाचे सत्र सुरूच आहे. ऑगस्ट महिन्यातील पावसाचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाने गेल्या काही दिवसांपासून दमदार हजेरी लावली होती. मात्र सध्या पावसाचा जोर कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र हवामान खात्याकडून पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
मुबईसह आसपासच्या परिसरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. तसेच आजही हवामान खात्याकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील काही भागामध्ये जोरदार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र राज्यातील काही भाग पावसाविना अजूनही कोरडाच आहे. या भागातील शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाने ताण दिल्याने काही भागातील खरी पिकांची कामे रखडली आहेत.
सध्या पावसाचा जोर कमी झाल्याने नागरिकांना मुसळधार पावसापासून सुटका मिळाली आहे. मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच या ठिकाणच्या सखोल भागात पाणी साचल्याने वाहतूक देखील ठप्प झाली होती.
जुलै महिन्यामध्ये धो धो कोसळल्यानंतर आता राज्यातील अनेक भागांमध्ये ऑगस्टमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. तसेच ऑगस्ट महिन्यातील पावसाबाबतचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
येत्या दोन दिवसांत कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच हवामान विभागाकडून ऑगस्टचे पहिले दहा दिवस हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पालघर, ठाणे, घोडबंदर, नाशिक, नंदुरबार, पुणे, सातारा या घाट परिसरात हवामान विभागाकडून पुढील दोन-तीन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आज या ठिकाणी पावसाची शक्यता
कोकणातील रायगड आणि रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यात हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच संपूर्ण
विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात जुलै महिन्यामध्ये सरासरीपेक्षा १७ टक्के जास्त पाऊस झाला आहे.