Maharashtra Havaman Andaj : यंदाचा मान्सून महाराष्ट्रात उशिरा दाखल झाला असला तरी सध्या तो मुसळधार कोसळत आहे. तसेच काही जिल्ह्यातील नद्यांना पूर आला आहे तर काही नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. तसेच आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील काही भागांना मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुस्कान झाले आहे. काही भागात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची खरीप पिके वाहून गेली आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई, उपनगर आणि ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने येथील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. तसेच अजूनही मुसळधार पाऊस कोसळत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
हवामान खात्याकडून आजही मुंबई, उपनगर आणि ठाण्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच राज्यातील कोकण आणि विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
तसेच हवामान खात्यांच्या अंदाजांनुसार आजही राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे राज्यातील काही धरणे भरली आहेत तर काही धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे.
राज्यातील या भागांमध्ये आजही मुसळधार कोसळणार
हवामान खात्याच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यामध्ये आणखी मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे येत्या चार ते पाच दिवसांत महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मुंबई, कोकणच्या काही भागात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भासाठी ऑरेंज आणि मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर भंडारा जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी देखील मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.