अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2022 Maharashtra news :– एप्रिल महिन्यात आगामी मान्सूनच्या अंदाजाचे वेध लागतात. भारतीय हवामान विभागाच्या आधी स्कायमेट या खासगी हवामान केंद्राने आपला अंदाज वर्तविला आहे.
यावर्षी महाराष्ट्रात मान्सून सामान्य राहील असा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे. गेल्या काही काळापासून जूनमध्ये पाऊस कमी होता, यावेळी मात्र जूनमध्येच पावसाला चांगली सुरवात होईल, असेही अंदाजात म्हटले आहे.
स्कायमेट ही भारतातील हवामान क्षेत्रातील खासगी कंपनी आहे. २००३ मध्ये जतीन सिंग यांनी या कंपनीची स्थापना केली आहे.
भारतीय हवामान विभागाच्या सरकारी वेधशाळेसोबतच स्कायमेट ही कंपनीही प्रसारमाध्यमांना हवामानाचा अंदाज पुरवते. त्यांचे बरेच अंदाज अचूक ठरल्याचीही उदाहरणे आहेत.
या कंपनीच्या अंदाजानुसार यावर्षीच्या मान्सूनमध्ये म्हणजे जून ते सप्टेंबर या काळात सरासरीच्या ९८ टक्के पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
महाराष्ट्रात मात्र सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी देशात जूनमध्ये सरासराच्या १०७ टक्के, जुलैमध्ये १०० टक्के, ऑगस्टमध्ये ९५ टक्के तर सप्टेंबरमध्ये ९० टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असलेली राज्य : राजस्थान, गुजरात, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, केरळ आणि कर्नाटक सरासरारीपेक्षा जास्त पाऊस : पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश