महाराष्ट्र

Maharashtra Police Bharati 2022 : राज्यात लवकरच 7 हजार पदांची पोलीस भरती !

Maharashtra Police Bharati 2022 : राज्यातील युवकांसाठी मोठी बातमी आहे. राज्यात लवकरच पोलीस भरती प्रक्रिया पार पडणार आहे. गृहविभागातर्फे ७ हजार पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी एकाचवेळी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.

राज्यात आता सात हजार पदांची पोलीस भरती (Maharashtra Police Recruitment) होणार आहे. पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी एकाच वेळी भरती प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लवकरच भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

सात हजार पदांच्या भरती प्रक्रियेनंतर राज्यांत लवकरच आणखी एक मोठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. ही भरती दहा हजार पदांसाठी असल्याची माहिती मिळत आहे. सातत्याने समोर येणारे भरती प्रक्रियेतील घोटाळे लक्षात घेता आता भरती प्रक्रिया गृहखातं राबवणार आहे. ज्यातील पोलिसांचं बळ कमी आहे.

त्यामुळं आम्ही मंत्रिमंडळासमोर पोलिसांची 50 हजार पदांची भरती करण्यासंदर्भात माहिती देऊ आणि त्यांसंदर्भात निर्णय घेऊ, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले होते.

गेल्या दोन वर्षापासून देशासह राज्यात कोरोनाच्या संकटामुळे नोकरभरतीची प्रक्रिया छांबली होती. कोरोनाचा फटका पोलीस भरती प्रक्रियेला बसल्याने आवश्यकता असताना राज्यात पोलीस कर्मचाऱ्यांची भरती होऊ शकली नाही.

राज्याची लोकसंख्या लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर पोलीस बळाची गरज आहे. आता त्यामुळे राज्य सरकाराने सुरू केलेल्या हालचालीमुळे पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

विविध कारणांमुळे गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात पोलीस भरती ही झाली नव्हती. त्यामुळे अनेकांना या संधीची प्रतीक्षा लागली होती. ती प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे.

वर्षातून एकदा पोलीस भरती ही होत असते. पोलीस दलात आपले कर्तव्य बजावण्याचे कित्येकांचे स्वप्न असतं आणि हेच स्वप्न उराशी बाळगून वर्षभर ही लोकं तयारीला लागतात. पोलीस दलात सेवा बजावण्याचे यांचे स्वप्न असतं. ते पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असतात. अशा तरूणांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.

ही भरती प्रक्रिया ही केवळ पोलीस कॉन्टेबल या पदासाठी पार पडणार आहे. एक ते दीड महिन्यात ही भरती प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे. तसेच राज्य सरकार आणखी एका मोठ्या भरतीच्या तयारीत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसापूर्वीच पाच हजार पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर आता हा दुसरा टप्पा हा सात हजारांचा असणार आहे. तर तिसरा टप्पा हा दहा हजारांपेक्षा जास्त पदांसाठी भरती होऊ शकते अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts