महाराष्ट्र

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागांत ‘ह्या’ तारखेला पाऊस !

Maharashtra Rain Alert : राज्यात दिवसा ढगाळ वातावरण राहिल्यामुळे कमाल तापमानात वाढ होत आहे, तर रात्रीच्या वेळी किमान तापमानात वाढ होत आहे. मात्र, १३ आणि १४ नोंव्हेबरला मध्य महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यात नोव्हेंबरच्या सुरुवातीस असलेली थंडी आता कमी होऊ लागली असून, अनेक भागांत अंशत: ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यातच चार ते पाच दिवसांत दक्षिण कोकणात तुरळ ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.

या महिन्यात पुढील काळात वातावरणाच्या स्थितीत सातत्याने बदल होणार आहेत. नोव्हेंबरच्या सुरुवातीलाही राज्याच्या बहुतांश भागांतील तापमानात घट होऊन थंडी अवतरली.

या काळामध्ये राज्यात आकाशाची स्थिती निरभ्र आणि कोरडे हवामान निर्माण झाल्याने प्रामुख्याने किनारट्टीच्या भागात कोकण विभागामध्ये आणि विदर्भात काही भागांत दिवसाच्या कमाल तापमानात वाढ होऊन उन्हाचा चटका वाढला. औरंगाबाद, पुणे, नगर, नाशिक, जळगाव आदी भागांत नीचांकी तापमानाची नोंद झाली.

राज्यात कशामुळे पाऊस ?
बंगालच्या उपसागरातील वायव्य भागापासून श्रीलंकेच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. पुढील २४ तासांत या कमी दाबाच्य पट्ट्याची तीव्रता आणखी वाढणार आहे. १२ नोव्हेंबरला हा कमी दाबाचा पट्टा तमिळनाडू-पुदुचेरी किनारपट्टीवर धडकणार आहे.

यामुळे दक्षिण भारतात पाऊस वाढणार आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे. मराठवाडा आणि विदर्भ या भागांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts