Maharashtra Viral News : जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यावर विश्वास ठेवणे कठीण होऊन बसते. जगातील प्रत्येक ठिकाणाला एक वेगळे भौगोलिक महत्त्व आहे. आपल्या महाराष्ट्राला देखील जगाच्या इतर भागापेक्षा वेगळे असे भौगोलिक महत्त्व आहे आणि राज्याला अद्भुत असे नैसर्गिक सौंदर्य सुद्धा लाभले आहे. कोकणातील अथांग समुद्रकिनारा, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, उंचच उंच डोंगररांगांनी नटलेला सुंदर निसर्ग, दऱ्या, तलाव, कळसुबाई सारखे उंच शिखर, लोणावळा सारखे थंड हवेचे ठिकाण असे विविध नैसर्गिक सौंदर्य राज्याला लाभलेले आहे.
महाराष्ट्राप्रमाणे देशातील इतर राज्यांना आणि जगातील इतर देशांना सुद्धा वेगवेगळे नैसर्गिक सौंदर्य लाभलेले आहे. मात्र जगातील बहुतांशी देशात एका गोष्टीत साम्य आहे ती गोष्ट म्हणजे संपूर्ण पृथ्वीतलावर बारा तासांची रात्र आणि बारा तासांचा दिवस असतो. तथापि, यालाही काही अपवाद आहेत.
जगाच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवाशेजारील देशांमध्ये दिवसाचा आणि रात्रीचा कालावधी भिन्न आहे. मात्र आपल्या महाराष्ट्रात देखील असे एक गाव आहे जिथे बारा तासांची रात्र आणि बारा तासाचा दिवस नसतो. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील एका गावात फक्त सहा तासांचा दिवस असतो.
इतर ठिकाणाशी तुलना केली असता राज्यातील या गावात चार तास लवकर सूर्योदय होतो आणि सूर्यास्त देखील चार तास लवकरच होतो. म्हणजेच या ठिकाणी फक्त सहा तासांचा दिवस असतो आणि उर्वरित 18 तास हे रात्रीचे असतात. कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही मात्र राज्यातील सर्वाधिक क्षेत्रफळ असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यात असे गाव आहे.
फोफसंडी असे या गावाचे नाव आहे. या गावात फक्त सहा तासांचा दिवस असल्याने हे गाव राज्याच्या इतर ठिकाणांपेक्षा खूपच भिन्न आहे. या गावाला लाभलेले नैसर्गिक सौंदर्य देखील खूपच अलौकिक असून येथील विहंगम दृश्य आपल्या नजरेत कैद करण्यासाठी राज्यभरातील तसेच देशातील कानाकोपऱ्यातील लोक या ठिकाणी गर्दी करत असतात.
अनेकजण या गावात पर्यटनासाठी येतात. या गावातील इतिहासाबाबत अनेकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे यामुळे अनेकजण या ठिकाणी जिज्ञासा पोटी भेटी देत असतात. गावाच्या आजूबाजूला उंचचंउंच डोंगररांग आहे. हे गाव जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात आहे.
येथील ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार इंग्रज काळात फॉफ नावाचा एक इंग्रज अधिकारी या गावात सुट्टीच्या दिवशी आरामासाठी येत असे. सुट्टीच्या दिवशी म्हणजेच संडेला अर्थातच रविवारी हा इंग्रज अधिकारी या गावात येत असल्याने या गावाला फॉफसंडे असे नाव पडले.
पुढे याचा अपभ्रंश झाला आणि फोफसंडी असे या गावाचे नाव पडले. विशेष म्हणजे या गावात आजही फॉफ हा इंग्रज अधिकारी ज्या गेस्ट हाऊस मध्ये राहत होता त्याचे अवशेष पाहायला मिळतात.
या गावाला भौगोलिक वेगळेपण तर लाभलेचं आहे. शिवाय याला ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. या महाराष्ट्रातील अनोख्या गावात नदी, धबधबा, डोंगर, हिरवी वनराई, दुर्मिळ पक्षी तुम्हाला सहजतेने पाहायला मिळतील.
म्हणजेच ऐतिहासिक आणि भौगोलिक वेगळेपणासोबतच या गावाला नैसर्गिक सौंदर्य देखील लाभले आहे. या गावात बारा वाड्या आहेत. त्यामुळे जर तुम्हीही आगामी काळात पर्यटनासाठी कुठे बाहेर पडणार असाल तर तुम्ही अहमदनगर मधील अकोले तालुक्यातील या गावाला नक्कीच भेट देऊ शकता.