महाराष्ट्र

Maharashtra Weather: नागरिकांनो सावधान ! अहमदनगरसह ‘या’ 10 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, ऑरेंज अलर्ट जारी

Maharashtra Weather: देशात बदलत असणाऱ्या हवामानाचा प्रभाव आता राज्यात दिसून येत आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो मागच्या दोन दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागात तापमानाचा पारा झपाट्याने वाढला आहे तर आता येत्या दोन दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

गुरुवारी राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी मुंबईतील कमाल तापमानात बुधवारच्या तुलनेत दोन अंशांनी वाढ झाली. यातच आता भारतीय हवामान विभागाने या आठवड्याच्या अखेरीस राज्यातील बहुतांश भागात, विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा अंदाज वर्तवला आहे.

दरम्यान, मुंबईत फक्त गडगडाट आणि रिमझिम पावसाची शक्यता आहे.  आपल्या अंदाजात, IMD ने म्हटले आहे की, “मुंबईसह महाराष्ट्राच्या किनारी भागात जास्त पाऊस अपेक्षित नाही आणि काही ठिकाणी खूप हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.”

हवामान खात्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद येथे ७ एप्रिल रोजी धोक्याचा इशारा दिला आहे. 8 एप्रिलला अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, गोंदिया, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.

IMD ने अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.  जिथे गारपीट होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने सांगितले की, पश्चिम आणि आग्नेय वाऱ्यांच्या टक्करमुळे पश्चिम महाराष्ट्रापासून तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्यामुळे हलका आणि मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. आयएमडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “वीकेंडपर्यंत वाऱ्याचा पॅटर्न असाच राहील, त्यानंतर आकाश मोकळे होईल.”

हे पण वाचा :-  Business Idea: होणार लाखोंची कमाई ! फक्त सुरु करा ‘हा’ धमाकेदार व्यवसाय ; जाणून घ्या कसं

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts