महाराष्ट्र

Mahavitaran News : शेतकरी खेचणार वीज कंपनीला ग्राहक मंचात

अहमदनगर Live24 टीम, 08 एप्रिल 2022 Maharashtra news : शेतकऱ्यांच्या कृषीपंपाची वीज बिल वसुली तूर्त थांबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, मधल्या काळात सक्तीने वसुली करताना वीज पुरवठा खंडित करण्याचे प्रकार झाले होते.

त्यामुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले, त्याची भरपाई मिळावी म्हणून शेतकऱ्यांनी आता महावितरण कंपनीला ग्राहक मंचात खेचण्याचा निर्णय घेतला आहे.

कोपरगाव तालुक्यातील शेतकरी महावितरण कंपनीकडूनच नुकसानीची भरपाई मिळावी, या मागणीसाठी ग्राहक मंचात धाव घेणार आहेत. कोपरगाव तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य त्रंबकराव सरोदे यांनी ही माहिती दिली.

विहिरीत पाणी असूनही वीज नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्याची भरभाई मागणार असल्याचे सरोदे यांनी सांगितले. पूर्वी नैसर्गिक आपत्तीमुळे पिके शेतक-यांच्या हातून गेली.

खरीपाचे नुकसान रब्बीत भरून निघेल या आशेवर शेतक-यांनी पदरमोड करून, दुबार कर्ज घेऊन रब्बी पिके घेतली. परंतु वीज वितरण कंपनीने वीज देण्यामध्ये हलगर्जीपणा केला.

शेतक-यांना मुददामहुन त्रास देण्यांच्या हेतूने अनेक ठिकाणची वीज रोहित्रे बंद केली. वीज बिल वसुलीसाठी जाणिवपूर्वक त्रास दिला.

ज्या शेतक-यांनी वेळेवर वीज बिले भरली त्यांनाही वीज वितरण कंपनीच्या लहरी कारभाराला सामोरे जावे लागले. पिकांना पाण्यांची गरज असतांना वीज न मिळाल्याने शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा हिरावला गेला.

याबाबत संबंधीत वीज वितरण कंपनीकडे वारंवार तक्रार करूनही त्यांनी याची दखल घेतली नाही. त्यामुळे ग्राहक मंचाकडे तकार दाखल करण्यात येणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts