Mahindra Thar : जर तुम्ही महिंद्रा थारचे चाहते असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण कंपनीने या कारवार एक धमाकेदार ऑफर आणली आहे.
अलीकडेच कंपनीने थारची नवीन RWD आवृत्ती सादर केली आहे. या RWD आवृत्तीची सुरुवातीची किंमत रु. 9.99 लाख (एक्स-शोरूम) आहे. म्हणजेच, आता तुम्ही ही SUV 10 लाखांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता.
4X4 व्हेरिएंटसाठी तुम्हाला थोडी किंमत मोजावी लागणार आहे. त्याची किंमत 13.59 लाख रुपयांपासून सुरू होते. पण सध्या तुम्हाला ही SUV मोठ्या सवलतीत खरेदी करण्याची संधी आहे. म्हणजेच कंपनी सध्या थारच्या 4WD आवृत्तीवर 1 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे.
थारवर 1 लाख सूट
वास्तविक, 1 लाखाच्या या सवलतीमध्ये, 10,000 रुपयांचा कॉर्पोरेट बोनस आणि 15,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 45,000 रुपयांपर्यंत रोख सूट किंवा 60,000 रुपयांच्या अॅक्सेसरीज पॅकचा लाभ मिळत आहे.
तथापि, या ऑफर केवळ MY2022 (2022 मध्ये उत्पादित केल्या जाणार्या) LX पेट्रोल AT 4WD प्रकारावर लागू आहेत, ज्याची सध्या किंमत 15.82 लाख रुपये आहे.
महिंद्रा थार प्रतीक्षा कालावधी
महिंद्र थारचा प्रतीक्षा कालावधी आता RWD आवृत्तीसाठी 18 महिने आणि 4WD आवृत्तीसाठी चार महिने आहे. जानेवारी 2023 पर्यंत थारसाठी प्रलंबित ऑर्डर 37,000 युनिट्स होत्या.
सर्वात जास्त प्रतीक्षा त्याच्या 1.5 लीटर डिझेल व्हेरियंटवर आहे, जो थारचा सर्वात स्वस्त प्रकार आहे. हे इंजिन तुम्हाला रियर व्हील ड्राइव्ह व्हेरियंटमध्ये देण्यात आले आहे. इंजिन 118PS पॉवर आणि 300Nm टॉर्क जनरेट करते. त्यात फक्त मॅन्युअल ट्रान्समिशन दिले आहे.