नालेसफाईत अनेकांनी आपले हात साफ केलेत; विखेंची शिवसेनेवर टीका

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान राज्यात पावसाचा सर्वाधिक फटका मुंबईला बसला आहे.

पाणीच पाणी झाल्याने मुंबईची तुंबई झाली आहे. याच मुद्द्यावरून राधाकृष्ण विखे पाटीलयांनी शिवसेनेला धारेवर धरले आहे. याबाबत बोलताना विखे पाटील म्हणाले कि, गेल्या 25 वर्षांपासून मुंबईत तुमचीच सत्ता आहे.

या 25 वर्षांत मुंबईचे प्रश्न का सोडवण्यात आले नाहीत?,’ असा सवाल करतानाच अहमदाबाद, चेन्नईकडे काय होतं हे सांगून दुसरीकडे बोट दाखवू नका. मुंबई तुंबली हे तुमचंच अपयश आहे,

अशा शब्दात भाजपचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. मुंबई तुंबली त्याचं अपयशही सर्वस्वी तुमचंच आहे.’ हजारो कोटी रुपये खर्च करूनही मुंबई कशी तुंबते?

नालेसफाईत अनेकांनी आपले हात साफ केलेत? असा सवाल करतानाच या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी मी विधानसभेत केली होती, असंही त्यांनी सांगितलं.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts