महाराष्ट्र

Maratha Reservation जामखेडच्या आंदोलनाचा राज्यात आदर्श !

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी जामखेड तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने गेल्या ६३ दिवसांपासून संपुर्ण राज्याचे दखल घ्यावी, असे नियोजन बद्ध शांततेत सर्व गावांचा समावेश करून साखळी उपोषण केले.

शांततेच्या मार्गाने चाललेले साखळी उपोषण नियोजन वाखाणण्याजोगे होते. संपूर्ण राज्यात दखल घेतली जाईल. आम्ही तसा अहवाल शासनास पाठविणार आहोत असे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी साखळी उपोषण सांगता प्रसंगी केले, अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी साखळी उपोषण सांगता कार्यक्रमात दिली.

पुढे बोलताना चंद्रे म्हणाले की, गेल्या ६२ दिवसापासून मराठा समाजाच्या बांधवांनी साखळी उपोषणासह आनेक मोर्चे व आंदोलने शांततेच्या मार्गाने करुन प्रशासनाला सहकार्य केले आहे.

जामखेड तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक २६ हजार कुणबी नोंदी सापडल्या आहेत तर यामधील मोडी लिपीतील सापडलेल्या १८ हजार कुणबी नोंदी या तपासणीसाठी जिल्ह्याच्या ठीकाणी पाठवण्यात आल्या आहेत. तसेच जामखेड तालुक्यातील काही भाग आष्टी तालुक्यात होता.

त्याठिकाणी तपासणी करण्यात येत आहे, तालु क्यातील कुणबी नोंदी तपासणी दरम्यान ८ हजार मराठीत तर १८ हजार कुणबी नोंदी या मोडी लिपीत सापडल्या आहेत. मोडी लिपीतील सापडलेल्या कुणबी नोंदी या तपासणीसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवण्यात आल्या आहेत.

जामखेड तालुक्यात अत्तापर्यंन्त नगर जिल्ह्यातून सर्वांत जास्त नोंदी जामखेड तालुक्यात आढळून आल्या आहेत. मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार मराठा क्रांती मोर्चा जामखेडच्या वतीने गेली ६२ दिवस चालू असलेल्या साखळी उपोषणाची सांगता मंगळवार दि.२६ डिसेंबर रोजी झाली. यावेळी साखळी उपोषणा दरम्यान ज्यांनी ज्यांनी योगदान दिले आशा पत्रकार व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, पोलीस निरीक्षक महेश पाटील, राष्ट्रवादीचे नेते प्रा. मधुकर राळेभात, सभापती शरद कार्ले, अजय काशिद, अवधुत पवार, केदार रसाळ, शहाजी राळेभात, संभाजी राळेभात, विकास राळेभात,

संजय वराट, दत्तात्रय सोले, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष तात्यासाहेब बांदल, राम निकम, रमेश आजबे, महेश यादव, सागर कोल्हे, दिगंबर चव्हाण, डॉ. भरत देवकर, डॉ. प्रशांत गायकवाड, डॉ. सुशिल पन्हाळाकर, डॉ. चंद्रशेखर नरसाळे, प्रशांत राळेभात, भरत लहाने, विकास आजबे, आशोक घुमरे, जयसिंग उगले, विकास पवळ अनिल भोरे, सरपंच सागर कोल्हे, काकासाहेब चव्हाण,

अमित जाधव यांच्यासह तालुक्यातून सहभागी झालेले सर्व गावकरी मंडळी, वारकरी, भजनी मंडळी, शहरातील सर्व उद्योजक, अधिकारी, वकील, डॉक्टर, औषध विक्रेते, नोकरदार, कष्टकरी, शेतकरी, महिला, बालक, सेवा निवृत्त अधिकारी, पत्रकार व मराठा बांधव उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts