Maruti Suzuki : जर तुम्हाला कमी बजेटमध्ये एकी जबरदस्त कार खरेदी करायची असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला मारुतीच्या कारवर मिळणाऱ्या डिस्काउंटबद्दल सांगणार आहे.
मारुती सुझुकी अल्टो
Maruti Suzuki Alto K10 कंपनीकडून 30,000 रुपयांची ग्राहक ऑफर आणि 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आहे. याशिवाय 4,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट आहे. एकूणच या कारवर 49,000 रुपयांची सूट मिळत आहे.
दुसरीकडे, मारुती सुझुकी अल्टो 800 ला 20,000 रुपयांची ग्राहक ऑफर, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,100 रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळते. अशाप्रकारे, याच्या खरेदीवर 38,100 रुपयांची सूट उपलब्ध आहे.
मारुती सुझुकी सेलेरियो ऑफर
नवीन मारुती सुझुकी सेलेरियो 2021 च्या उत्तरार्धात बाजारात पदार्पण करणार आहे. या कारवर एकूण 44,000 रुपयांची सूट दिली जात आहे. यामध्ये रु. 25,000 रोख सवलत, रु. 15,000 एक्सचेंज बोनस आणि रु. 4,000 कॉर्पोरेट सूट यांचा समावेश आहे.
maruti suzuki wagonr ऑफर
देशातील सर्वाधिक विकल्या जाणार्या कारपैकी एक मारुती सुझुकी वॅगनआर देखील आहे, ज्यावर एकूण 59,000 रुपयांची सूट मिळत आहे. यामध्ये 40,000 रुपये रोख सूट, 15,000 रुपये एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपये कॉर्पोरेट सूट मिळत आहे.
मारुती स्विफ्टवर किती सूट
मारुती सुझुकीच्या कॉम्पॅक्ट हॅचबॅक कार स्विफ्टबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनी या कारवर एकूण ₹ 49,000 ची सूट देत आहे. यामध्ये ₹30,000 ची रोख सवलत, ₹15,000 चा एक्सचेंज बोनस आणि ₹4,100 ची कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे.
मारुती सुझुकी डिझायरवर सूट
मारुती सुझुकी त्यांच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या डिझायर कारवर ₹10000 चा एक्स्चेंज बोनस मोफत देत आहे. कंपनीने या कारवर कोणत्याही प्रकारची कॅश आणि कॉर्पोरेट सूट दिलेली नाही.
मारुती इको कार डिस्काउंट ऑफर
मारुती सुझुकी Eeco कार्गोवर ₹15,000 ची रोख सवलत आणि ₹4,000 च्या कॉर्पोरेट सूटसह ₹10,000 चा एक्सचेंज बोनस देत आहे.
मात्र ही सूट ऑफर वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगळी असू शकते. याशिवाय, ते कार आणि डीलर्सच्या उपलब्धतेवर देखील अवलंबून असते. तुमच्या शहरात ही सूट ऑफरची रक्कम भिन्न असू शकते.