MG Cars : जर तुम्ही कारचे चाहते असाल आणि नवीन कार खरेदीच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खास आहे. कारण MG भारतीय बाजारपेठेत एकापेक्षा जास्त शक्तिशाली कार लॉन्च करत आहे.
भारतीय कार बाजारात MG ने लोकांच्या मनावर राज्य केले आहे. लोक या गाड्यांना खूप पसंत करत आहेत. कंपनीने गेल्या वर्षी ऑटोमेकरने 1 लाख कारच्या विक्रीचा टप्पा पार केला होता. दरम्यान, MG Astor आणि MG Hector शी संबंधित खास वैशिष्ठे जाणून घ्या.
एमजी एस्टर आणि एमजी हेक्टर इंजिन
MG Astor मध्ये 1.5 लीटर नॅचरल एस्पिरेटेड इंजिन आहे जे 110 bhp आणि 1.3 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन 140 bhp टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन 6 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येते.
एमजी हेक्टरच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, त्याचे पेट्रोल इंजिन 1.5 लीटर टर्बो क्षमतेसह येते, जे 143 एचपी पॉवर जनरेट करते. यासह, त्याची डिझेल आवृत्ती 2.0 लिटर क्षमतेसह येते जी 170 एचपी पॉवर जनरेट करते.
MG Astor आणि MG हेक्टर किंमत
MG Astor च्या पेट्रोल व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 10.52 लाख रुपये आहे. तर त्याचे पेट्रोल व्हर्जन टॉप मॉडेल 15.43 किमी/ली मायलेज देते. दुसरीकडे, MG Hector च्या पेट्रोल व्हर्जनची किंमत 14.73 लाख रुपये एक्स-शोरूम पासून सुरू होते. त्याच्या पेट्रोल व्हर्जनचे टॉप मॉडेल 15.58 किमी/लिटर मायलेज देते.
MG Astor आणि MG Hector
फीचर्समुळेच या कार लोकांना खूप पसंत पडत आहेत. यामध्ये लेन डिपार्चर प्रिव्हेंशन, इंटेलिजेंट हेडलॅम्प कंट्रोल, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेक, लेन डिपार्चर वॉर्निंग आणि रिअर ड्राईव्ह असिस्ट यांसारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.
यासोबतच ड्रायव्हिंग साठी यामध्ये एक खास कॅमेराही देण्यात आला आहे. एमजी हेक्टर पुश बटण स्टार्ट, ऑटो होल्ड, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक आणि स्टीयरिंग व्हील यांसारखी अनेक उत्तम वैशिष्ट्ये देते.