महाराष्ट्र

Mini Tractor Subsidy: 9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर खरेदीवर 90 टक्के अनुदान मिळवण्याची सुवर्णसंधी! ‘या’ जिल्ह्यासाठी अर्ज सुरू

Mini Tractor Subsidy:- कृषी यांत्रिकीकरण हा शेतीचा आता अविभाज्य भाग बनला असून कृषी यांत्रिकीकरणाला चालना आणि प्रोत्साहन देण्याच्या करिता राज्य शासनाच्या माध्यमातून विशेष योजना राबविण्यात येत आहेत. कृषी यंत्रांच्यामध्ये ट्रॅक्टर हे यंत्र शेतकऱ्यांचे अगदी जवळचे यंत्र आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

शेतीची पूर्व मशागतीपासून तर आंतरमशागत आणि पिकांच्या काढणीसाठी ट्रॅक्टरचा वापर केला जातो व अनेक दुसरी यंत्रे देखील हे ट्रॅक्टरच्या मदतीने चालवले जातात. ट्रॅक्टरमध्ये जर आपण मिनी ट्रॅक्टरचा विचार केला तर आता फळबागांमधील आंतरमशागतींच्या कामांसाठी मिनी ट्रॅक्टर हे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरताना आपल्याला दिसून येत आहे.

त्यामुळे महत्त्वाच्या असलेल्या या मिनी ट्रॅक्टर साठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून 2023-24 अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नोंदणीकृत जे काही बचत गट आहेत त्या गटांना नऊ ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने 90% अनुदानावर वाटप करण्यात येणार आहेत

व सध्या परभणी जिल्ह्यातील इच्छुक व नोंदणीकृत स्वय:सहायता बचत गटांनी याकरिता अर्ज करावेत अशा प्रकारचे आवाहन देखील परभणी जिल्ह्याचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त गीता गुट्टे यांनी केली आहे.

 काय आहे यासाठीची पात्रता?

1- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा नोंदणीकृत बचत गट असणे गरजेचे आहे.

2- तसेच बचत गटाचे खाते राष्ट्रीयकृत बँकेमध्ये असावे.

3- बचत गटामध्ये कमीत कमी दहा सदस्य असणे गरजेचे आहे व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यापैकी 80% सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असणे गरजेचे आहे.

4- तसेच संबंधित बचत गटाचा अध्यक्ष व सचिव हे अनुसूचित जातीचे असावेत.

5- तसेच बचत गटातील सर्व सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचे आहे.

6- स्वय:सहायता बचत गटांनी राष्ट्रीयकृत बँकेत बचत गटाच्या नावाने बँक खाते उघडणे गरजेचे आहे व सदरील बँक खाते बचत गटांचे अध्यक्ष व सचिव यांच्या आधार क्रमांकाशी कनेक्ट म्हणजे संलग्न केलेले असावे.

7- बचत गटाने व गटातील जे काही सदस्य असतील त्यांनी यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

8- यामध्ये मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची जास्तीत जास्त मर्यादा ही साडेतीन लाख रुपये इतकी ठेवण्यात आलेली आहे.

9- त्यामध्ये जी काही कमाल रकमेची मर्यादा आहे तिच्या दहा टक्के( 35 हजार रुपयांचा डीडी) स्वतःचा हिस्सा भरल्यानंतर जी काही प्रत्यक्ष किंमत आहे तिचे दहा टक्के( तीन लाख पंधरा हजार रुपये) शासकीय अनुदान यामध्ये देण्यात येईल.

10- समजा यामध्ये अर्जांची संख्या दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त झाली तर पात्र उमेदवारांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येईल.

11- तसेच बचत गटाच्या कमीत कमी एका सदस्याकडे तरी ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजेच वाहन चालवण्याचा सक्षम अधिकाऱ्याचा परवाना असणे गरजेचे आहे व या संबंधीचे प्रशिक्षण घेत असलेले प्रमाणपत्र असावे.

 काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?

यामध्ये एका बचत गटाला एकच अर्ज मिळणार असून परिपूर्ण कागदपत्रांसहित पूर्ण भरलेले अर्ज आवश्यक कागदपत्र तसेच डिमांड ड्राफ्ट सह हे अर्ज 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत शासकीय सुट्टीचा दिवस वगळून कार्यालयीन वेळेमध्ये सादर करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

Ajay Patil

Recent Posts