अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख त्यांचे साधेपणामुळे जिल्ह्यात चर्चेत असतात. त्याचा हाच प्रत्यय नेवासा येथे नुकताच ग्रामस्थांना आला.
चक्क चहाच्या ठेल्यासमोरच बसूनच मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाखांनी सर्वसामान्यांचे प्रश्न समजावून घेत ते सोडविण्याच्या दृष्टीने सुसंवाद साधत तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी सर्वांच्या आग्रहाखातर त्यांनी ठेल्यासमोर बसूनच चहाचा आस्वादही घेतला. गडाख हे त्यांच्या साधेपणासाठी नावाजले जातात.
आमदार असल्यापासून गावातील चहाची टपरी त्यांचे जनसंपर्क केंद्र आहे. आता मंत्री झाले तरी मित्रमंडळी समवेत ते साध्या चहाच्या टपरीवरच बसून गप्पा रंगवतात.
असाच एक अनुभव सोशल मिडियावर मंत्री महोदयांनी शेअर केला आहे.तालुक्यात दौर्यावर असतांना निंभारी, खुपटी मार्गे नेवासा शहरात जात असताना
ज्ञानेश्वर मंदीर रोडवर एका चहाच्या टपरीवर गडाख थांबले व त्यांनी मोठ्या प्रेमानं तिथे सर्वांसोबत चहा घेतला. अचानक आपल्या हॉटेलला मंत्री महोदयांचे पाय लागले हे पाहून त्या व्यावसायिकाचा आनंदही गगनात मावेना झाला.
मंत्री नात्याने मोठी जबाबदारी असताना देखील गडाख नेवासा तालुक्यातील जनतेशी संपर्कात राहून समस्या व प्रश्न जाणून घेण्याचा नेहमीच प्रयत्न करतात.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved