नेवासे :- पक्षाच्या सर्वेक्षणानुसार माझी उमेदवारी नक्की आहे. मला उमेदवारी देऊ नका म्हणणारे विरोधकांचे हस्तक आहेत. भाजप हा जनमतावर विश्वास ठेवणारा पक्ष असल्याने गडाखांनी माझ्या उमेदवारीत कितीही अडथळे आणले, तरी त्यांचे मनसुबे टिकणार नाहीत, असे भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी शुक्रवारी सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेवासे तालुक्यातील राजकीय हलचालींना वेग आला असून राजकीय डाव-प्रतिडाव खेळले जात आहेत. याबाबत आमदार मुरकुटे म्हणाले, माझ्या विरोधातील शिष्टमंडळाला कोण रसद पुरवते हे आता लपून राहिलेले नाही.
माझ्या उमेदवारीला विरोध हा तर रडीचा डाव आहे.कारण माझा विजय जनतेच्या दरबारात निश्चित आहे. जनसंपर्क आणि विकासकामांची घौडदौड जनतेच्या मनात घर करून आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी पक्षाकडून केल्या गेलेल्या सर्वेक्षणात माझे काम अतिउत्तम असतानाही मला उमेदवारी मिळू नये, यासाठी विरोधकांनी चालवलेला हा आटापिटा अगदी व्यर्थ आहे.
नेवासे विधानसभा मतदारसंघात आमदार मुरकुटे व माजी आमदार शंकरराव गडाख यांच्यात लढत होणार आहे. मात्र, भाजपचेच सचिन देसरडा, राष्ट्रवादीचे डॉ. क्षितिज घुले, माजी आमदार तुकाराम गडाख, माजी आमदार संभाजीराव फाटके यांच्या भूमिकेकडेही राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.
Don’t forget to like, share, and follow Ahmednagarlive24 On Social Media Stay tuned with us. Get Breaking News Updates Of Ahmednagar Visit Website – http://wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com Subscribe to on YouTube Channel – http://bit.ly/YT-Ahmednagarlive24 Like us on Facebook – http://bit.ly/FB-Ahmednagarlive24 Follow us on Twitter – http://bit.ly/TW–Ahmednagarlive24 Follow us on Instagram – http://bit.ly/IG-Ahmednagarlive24 Download Our App– http://bit.ly/Ahmednagarlive24App Stay tuned for all the breaking news of ahmednagar! Read Latest News Updates From Ahmednagar City , Akole, Jaamkhed, Karjat, Kopargaon, Newasa, Parner, Pathardi, Rahata, Rahuri, Shevgaon, Shrigonda, Sangamner, Shrirampur, And Shirdi On Ahmednagar Live24 |