सावेडी नाका येथील फटाका मार्केटचे आमदार जगताप यांच्या हस्ते शुभारंभ

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-सावेडी नाका येथील नगर फटाका असोसिएशनच्या फटाका मार्केटचे शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले.

यावेळी राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, फटाका असोसिएशनचे अध्यक्ष निखील वारे, कार्याध्यक्ष सतीश बारस्कर, वैभव ढाकणे, दिपक खेडकर, योगेश भुजबळ, दत्तात्रय वाबळे, योगेश रोकडे,

राजू तांदळे, शंतनू भाळवे, निलेश खळदकर, नितीन हराळे, गोपाळ बोरुडे, किरण जावळे, प्रसाद बनकर, मारुती बोरुडे आदींसह फटाका व्यापारी उपस्थित होते.

आमदार संग्राम जगताप म्हणाले की, कोरोना महामारीच्या टाळेबंदीनंतर राज्य सरकारने अनलॉकचे धोरण स्विकारल्याने व्यापार, उद्योगधंदे व व्यवसाय पुर्वपदावर येत आहे.

या दिवाळीत अर्थव्यवस्था सुरळीत होण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी देखील काळजी घेऊन व नियमांचे पालन करुन बाजारपेठेत वावरण्याची गरज आहे. शहर झपाट्याने वाढत असताना उपनगराचा विस्तार होत आहे.

उपनगरात देखील फटाका मार्केट सुरु झाल्याने नागरिकांची सोय होणार आहे. एकाच ठिकाणी गर्दी न होता या फटाका मार्केटच्या माध्यमातून नागरिकांना फटाके उपलब्ध होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

नगर फटाका असोसिएशनचे दिपक खेडकर यांनी मागील वीस वर्षापासून सावेडी भागातील नागरिकांची सोय होण्यासाठी या भागातच फटाका मार्केट लावले जात आहे.

या फटाका मार्केटच्या माध्यमातून सावेडी उपनगरासह नगर जिल्हा व इतर जिल्ह्यातील नागरिकांना ठोक व किरकोळ स्वरुपात नामांकित चांगल्या दर्जाचे फटाके उपलब्ध होत आहे.

कमी किंमतीत चांगल्या दर्जाचे फटाके उपलब्ध होत असल्याने नागरिकांचा या मार्केटला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts