अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर शहर व लगतच्या परिसरात भुईकोट किल्ला, चॉंदबिबी महल, फराहबक्ष महाल, भिस्तबाग महाल, टॅंक म्युझिअम, अवतार मेहेरबाबा यांचे समाधीस्थळ आदी पर्यटन व धार्मिक स्थळे आहेत.
या पर्यटनस्थळांचा विकास झाल्यास नगरच्या पर्यटनाला चालना मिळू शकेल. तसेच नगर शहरासह जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास व त्यातून नगर पर्यटनाला चालना देण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी पुढाकार घेतला आहे.
मुंबई येथे पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पर्यटनस्थळांच्या ठिकाणी मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी
आमदार जगताप यांनी आग्रही भूमिका मांडत निधीची मागणी केली आहे. यावेळी आमदार रोहित पवार, आमदार किरण लहामटे, जुन्नरचे आमदार अमित बेनके आदी उपस्थित होते.
यासाठी सुरुवातीला प्रशासनामार्फत या पर्यटनस्थळांचे सर्वेक्षण होऊन आराखडा तयार होणे आवश्यक आहे. या संदर्भात बैठकीत भूमिका मांडून निधीची मागणी करण्यात आली असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved