अभिनेत्री मानसी नाईकची छेड काढल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा

मुंबई :- अभिनेत्री मानसी नाईकची छेड काढणाऱ्या तिघांविरोधात साकीनाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानसी ५ फेब्रुवारी रोजी पुण्यात कार्यक्रम सादर करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिच्यासाेबत छेडछाडीची घटना घडली होती. मानसी नाईक पुण्यातील शिरुर तालुक्यात रांजणगाव येथे एका वाढदिवसानिमित्ताने कार्यक्रमासाठी गेली होती. त्यावेळी कार्यक्रम सादर करत असताना एका अज्ञात व्यक्तीने तिच्यासोबत गैरकृत्य केले. तसेच त्या व्यक्तीने तिला मंचाजवळ जाऊन धमकवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मानसीकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी मानसीने साकीनाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी रांजणगाव पोलिसांकडे सोपवली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts