MPSC Recruitment 2023 : जर तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आलेली आहे. कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत काही रिक्त पदांसाठी भरती आयोजित करण्यात आलेली आहे.
त्यानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज सुरु होण्याची तारीख 10 एप्रिल असून तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मे 2023 पर्यंत आहे.
एकूण पदे : 146
पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, राज्य कामगार विमा योजना, गट-अ
शैक्षणिक पात्रता: MBBS
वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹294/-]
पगार – 56,100 ते 1,77,500/-अधिक नियमानुसार अनुज्ञय भत्ते
निवड पद्धत
प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान असून, किमान अर्हता धारण केली मुलाखतीस बोलाविण्याकरिता पात्र असणार नाही. जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जाची संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता आणि/अथवा अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता/अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे अथवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल. चाळणी परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यास, अहंता आणि/अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही.
चाळणी परिक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे माध्यम व इतर बाबी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील. 10.5 चाळणी परीक्षा घेतल्यास चाळणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या विचारात घेऊन तर चाळणी परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखतीच्या गुणांच्या आधारे उमेदवाराची शिफारस करण्यात येईल.
मुलाखतीमध्ये किमान 41% व त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या उमेदवारांचाच शिफारशीसाठी विचार केला जाईल.
प्रस्तुत पदाची निवड प्रक्रिया शासन पत्र, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्रमांक संआसे-२०२१/प्र.क्र.१६७/सेवा-१, दिनांक 15 फेब्रुवारी, 2023 अन्वये प्राप्त अभिप्रायानुसार वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील राज्य कामागार विमा योजना ही सार्वजनिक आरोग्य विभागाकडे वर्ग करण्यात आली असली तरी या योजनेचे स्वतंत्र सेवा प्रवेश नियम मंजूर झालेले नाहीत.
आतापर्यन्त वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या सदर नियमाच्या अनुषंगाने पदभरती करण्यात येत आहेत. त्यानुसार प्रस्तुत पदाची निवड प्रक्रिया तत्कालिन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील वैद्यकीय अधिकारी, गट-ब (सेवाप्रवेश नियम) 1985 तसेच शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक एसआरव्ही-१०८८/प्र.क्र.१३/८८/बारा, दिनांक 29 जुलै, 1993 अन्वये निरनिराळ्या वेतनश्रेणीतील पदांचे सुधारित वर्गीकरण आणि आयोगाकडून वेळोवेळी सुधारण्यात येणा-या कार्यनियमावली / कार्यपध्दतीनुसार राबविण्यात येईल.
अंतिम शिफारस यादी तयार करताना समान गुण धारण करणा-या उमेदवाराची क्रमवारी आयोगाच्या दिनांक 12 सप्टेंबर 2022 रोजीच्या प्रसिध्दीपत्रकामधील तरतुदीनुसार निश्चित करण्यात येईल.
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 मे 2023 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : mpsconline.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा