महाराष्ट्र

Mudra Yojana : सरकारची भन्नाट योजना ! कोणतेही तारण न ठेवता मिळणार 10 लाख रुपये पर्यंत कर्ज, मिळेल कमी दरात लोन…

Mudra Yojana : जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज घेण्याची धरपड करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला कोणतेही तारण न ठेवता 10 लाख रुपये कर्ज सहज कसे मिळवता येईल याबद्दल सांगणार आहे.

या सरकारच्या योजनेचं नाव प्रधानमंत्री मुद्रा योजना हे आहे. ज्या नागरिकांना स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी ही योजना खूप महत्वाची ठरू शकते. देशातील बेरोजगार तरुणांना स्वावलंबी बनवण्याच्या आणि लहान व्यवसाय असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना बळकट करण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने या योजनेची सुरुवात 2015 केली होती.

विशेष म्हणजे या योजनेंतर्गत नॉन-कॉरपोरेट आणि बिगर कृषी या कारणांसाठी लोन उपलब्ध करुन दिले जाते. चला तर मग पाहुयात या योजनेचे फायदे आणि अर्ज करण्याची प्रोसेस.

मुद्रा योजनेचे कर्ज कोठे उपलब्ध आहे –

मुद्रा योजनेसाठी आपण कोणत्याही सरकारी-खाजगी बँकांमध्ये अर्ज करू शकतो.
तसेच प्रादेशिक ग्रामीण बँका, लघु वित्त बँका, गैर-वित्तीय कंपन्यांमध्ये देखील मुद्रा कर्जासाठी अर्ज करू शकतो.
कॅटेगिरीचा विचार करून कर्जाच्या रकमेचे लिमिट बनवण्यात आली आहे. या मुद्रा लोन योजनेमध्ये 3 प्रकारच्या कॅटेगिरी आहेत.

शिशु लोन

यामध्ये 50 हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत म्हणून कर्ज उपलब्ध करून देण्यात येते आहे.

किशोर लोन

यामध्ये 5 लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध आहे. आणि

तरुण लोन

तरुण कर्जामध्ये 10 लाख रुपयांपर्यंतची रक्कम उपलब्ध करून दिली जाते.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे असणारे फायदे-

– प्रधानमंत्री मुद्रा लोन हे लोन पूर्णपणे तारणमुक्त आहे. तसेच, या कर्जसाठी कोणतेही प्रोसेसिंग फीस आपल्याला भरावी लागत नाही.

– आपण 1 वर्षापासून ते 5 वर्षांपर्यंत कालावधी घेऊन कर्जाची परतफेड करू शकता. मात्र जर आपल्याला 5 वर्षात परतफेड करता नाही आली तर त्याचा कालावधी 5 वर्षांनी वाढवता येतो.

– प्रधानमंत्री मुद्रा कर्जाच्या रकमेवर कोणतेही व्याज घेतले जात नाही. आपण मुद्रा कार्डच्या माध्यमातून काढलेल्या आणि खर्च केलेल्या पैशावर व्याज आकारले जाते.

– आपण partnership मध्ये कोणताही व्यवसाय करत असाल तरीही आपण मुद्रा योजनेद्वारे कर्ज घेऊ शकता. यामध्ये आपल्याला तीन प्रकारामध्ये कर्ज मिळते. -व्याजदर हा संबंधित प्रकारावरून बदलतात.

मुद्रा लोन साठी अर्ज कसा करावा?

– आपल्याला सर्वप्रथम mudra.org.in वर जावे लागेल.

– त्यांनतर आपल्याला तीनही कॅटेगिरी स्क्रीन वर दिसतील, आपल्या हिशोबाने कॅटेगिरी निवडा.

– त्यांनतर नवीन पेज ओपन होईल, नंतर अर्ज डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढून घ्या.

– त्यांनतर आधार कार्ड, पॅन कार्ड, कायमस्वरूपी आणि व्यवसायाच्या पत्त्याचा पुरावा, इन्कम टॅक्स रिटर्नची कॉपी आणि पासपोर्ट आकाराचा फोटो ही सर्व कागदपत्रे द्या.

– जवळ असणाऱ्या बँकेत हा अर्ज सबमिट करा. त्यांनतर बँक आपल्या अर्जाची पडताळणी करेल आणि पडताळणी झाल्यानंतर कर्ज 1 महिन्याच्या आत उपलब्ध होईल.

– आपल्याल ऑनलाइन अर्ज करण्यासाठी युजर नेम आणि पासवर्ड तयार करावा लागेल. याच्या मदतीने तुम्हाला मुद्रा लोन वेबसाइटवर अर्ज करावा लागेल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Mudra Yojana

Recent Posts