जिल्हाधिकारी साहेबांची ‘ती’ आक्रमकता नगरकर मिस करणार

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची नुकतीच बदली झाली असून त्यांच्या जागी पुणे अतिरिक्त विभागीय आयुक्त आर. बी. भोसले यांचो जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांची यापूर्वीच मुंबईला बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर आज कोकण अतिरिक्त विभागीय आयुक्त आर. एस. क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान तत्कालीन जिल्हाधिकारी राहूल हिवेदी यांनी जिल्ह्याचा पदभार स्वीकारला होता. लगेच त्यांनी त्यांची आक्रमकता दाखवत अवैध धंद्यांना रोख बसविण्यासाठी कठोर पाऊले उचलली.

द्विवेदी साहेबांच्या काळात अतिक्रमण धारकांवर करण्यात आलेली कारवाई हे नगरकर कधीच विसरू शकणार नाही. तसेच काही काळ द्विवेदी यांनी महापालिका आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार देखील सांभाळला होता.

या काळात त्यांनी नगर शहरातील अनेक नागरी समस्यांचा आढावा घेत नागरिकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावले. दरम्यान आता जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता नगरकरांच्या समस्यांचे ओझे नूतन जिल्हाधिकाऱ्यांच्या खांद्यावर आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24