कोविड-१९ रुग्णांसाठी रिलायन्स जिओ कन्वेंशन सेंटरचा विचार – पालकमंत्री अस्लम शेख

मुंबई, दि.०८ : कोविड-१९ बाधित रुग्णांच्या विलगीकरणासाठी आवश्यकता भासल्यास वांद्रे-कुर्ला संकुल येथिल रिलायन्स  जिओ कन्वेंशन सेंटरचा विचार केला जाईल;

यासंबंधी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रविण परदेशी यांच्याशी चर्चा करण्यात आल्याची माहिती मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.

श्री.शेख यांनी मुंबईतील कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना व इतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर

, पोलिस उपायुक्त मंजुनाथ सिंगे, पालिका उपायुक्त व अन्य उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत पाहणी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी कलिना येथील पोलिस प्रशिक्षण केंद्र व वांद्रे कुर्ला संकुल येथे उभ्या राहत असलेल्या एम.एम.आर.डी.एच्या १००० खाटांच्या विलगीकरण केंद्रास भेट देऊन पाहणी केली.

पालकमंत्री श्री.शेख म्हणाले की, वांद्रे-कुर्ला संकुल येथील जिओ कन्वेंशन सेंटरची १००० रुग्णांची सोय होऊ शकेल एवढी क्षमता आहे.

भविष्यात गरज भासल्यास या सेंटरचा विलगिकरण केंद्र म्हणून विचार करण्यात येईल. यासंबंधी पालिका आयुक्तांशी चर्चा करण्यात आली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24