खा.दिलीप गांधींचा पत्ता कट सुजय विखे भाजपचे उमेदवार !

6 years ago

अहमदनगर :- खा.शरद पवार व ‘राष्ट्रवादी’ नगरची जागा काँग्रेसला सोडेना आणि ‘राष्ट्रवादी’मध्येही प्रवेश देईना.

मात्र, कोणत्याही परिस्थितीत लोकसभा लढवायचीच, असा चंग बांधलेल्या सुजय विखे यांनी अखेर भाजपातून लोकसभा लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

उद्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सुजय विखे यांचा भाजप प्रवेश होणार असून लोकसभेच्या उमेदवारीसह शिर्डी साईबाबा संस्थानचे उपाध्यक्षपदही सुजय विखेना मिळणार आहे. 

गेले दोन दिवस गिरीश महाजन यांनी केलेल्या मध्यस्थी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार सुजय विखे भाजपात दाखल होणार आहेत.

दरम्यान सुजय विखे यांनी भाजप प्रवेश केल्याने आता विद्यमान खा.दिलीप गांधी यांचा पत्ता कट झाला असून खा.गांधी काय भूमिका घेतात हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल.

Recent Posts