अहमदनगर :- राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील यांचा भाजपा प्रवेश निश्चित झाला आहे.
आज मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास डॉ. सुजय हे त्यांच्या निवडक समर्थकांसह भाजपाच्या मंत्रालयाजवळील कार्यालयात पक्ष प्रवेश करणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे आदी मान्यवर त्यांचे पक्षात स्वागत करतील. या सोहळ्यास विखे यांचे निवडक सहकारी उपस्थित राहणार आहेत.