डॉ . सुजय विखेंना भाजपचे ‘ टेन्शन ‘

अहमदनगर :- डॉ . सुजय विखे यांना भाजप प्रवेशाच्या आदल्या दिवशीच टेन्शन मध्ये असल्याचे दिसून आले . विखे यांच्या भाजप प्रवेशाला भाजपमधून जोरदार विरोध सुरू झाला आहे. 

त्याचवेळी विखे यांचे समर्थकही भाजपमधील प्रवेशाबाबत चिंताजनक आहे . विखेसमोरच काही कार्यकर्त्यांनी नव्या पक्षात गेल्यानंतर पुढील वाटचालीबाबत काळजी व्यक्त केली. 

नगरजवळील विळद घाट येथील विखे यांच्या कार्यालयात डॉ . सुजय विखे यांनी निवडक कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. 

दरम्यान, भाजपमध्ये गेल्यास पुढील वाटचालीबाबत काळजी व्यक्त करीत भाजपचे वरिष्ठ नेते प्रचाराला येतील का, काही दगा तर होणार नाही ना, अशीही काळजी काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24