वाचा काय म्हणाले सुजय विखे भाजप प्रवेश करताना….
- मोदी साहेब, शाह साहेब आणि फडणवीस साहेब यांचे आभार, कारण त्यांनी मला कार्यकर्ता म्हणून संधी दिली – सुजय विखे पाटील
- मला भाजपमध्ये प्रवेश दिला त्याबदल्ल सर्व नेत्यांचे आभार – सुजय विखे पाटील
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेले निर्णय पाहता, मोदींच्या प्रभावातून माझ्यासह युवकांनी भाजपमध्ये प्रवेश – सुजय विखे पाटील
- माझ्या वडिलांच्या विरुद्ध निर्णय घ्यावा लागलाय, त्यामुळे माझ्यावर मोठी जबाबदारी आहे – सुजय विखे पाटील
- नगरमधील दोन्ही खासदार युतीचे असतील, असा शब्द देतो – सुजय विखे पाटील
- मुख्यमंत्र्यांनी मला प्रचंड आदर दिला, वडिलांच्या निर्णयाविरुद्ध जाऊन मी भाजप प्रवेश केला. – सुजय विखे पाटील
- माझ्या कार्यकर्त्यांना सुजय विखे पाटील यांच्या नावाच्या घोषणा करण्याची सवय आहे, भाजपच्या घोषणा द्यायला वेळ लागेल – सुजय विखे पाटील
- नगरमध्ये भाजप वाढवण्यासाठी मनापासून प्रयत्न करेन. नगरमधील जागा युतीच्या असतील.- सुजय विखे पाटील
- भाजपचा विजय असो, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजय असो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विजय असो – सुजय विखे पाटील