ढवळगाव : आगामी विधानसभा निवडणुकीत विकासकामांच्या जोरावर जनादेश मागणार आहोत, असे प्रतिपादन आ. राहुल ज़गताप पाटील यांनी केले.
श्रीगोंदा तालुक्यातील म्हसे येथे पाच लाख रुपये खर्चाच्या स्मशानभूमीत पेव्हिंग ब्लॉक बसविणे कामाच्या उद्घाटनप्रसंगी आ. जगताप बोलत होते. आ. ज़गताप पुढे म्हणाले,
आम्ही जनतेला जी आश्वासने दिली, ती पूर्ण करणार असून, ज़नतेने विकासकामे करणाऱ्यांच्या मागे उभे राहिले पाहिज़े. काही लोक लोकांना देवाधर्माच्या नादी लावत मते मागण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहेत;
परंतू तालुक्यातील जनता सूज्ञ असून, विश्वास व विकासाच्या बाजूने नक्की उभे राहतील, असा मला विश्वास आहे.