सुवेंद्र गांधी लोकसभा निवडणूक लढविणार !

अहमदनगर :- नगर दक्षिणचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना लोकसभेचे तिकीट नाकारल्याने त्यांचे पुत्र सुवेंद्र गांधी लोकसभा निवडणूक लढविणार आहेत.

नगर दक्षिण लोकसभा जागेसाठी डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खासदार दिलीप गांधी समर्थकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती.

दरम्यान आज खासदार दिलीप गांधी यांच्या उपस्थितीत नगर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

आजवर पक्षाशी एकनिष्ठ राहूनही भाजपाने सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर केली. पक्षाने खासदार दिलीप गांधी यांच्यावर अन्याय केल्याची भावना वाढीस लागली आहे.

या मेळाव्यात खा. गांधी यांचे सुपुत्र सुवेंद्र गांधी यांनी आपण अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ठ केले.

कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असून लोकसभा निवडणूक लढविण्याची गळ घातली जात आहे. कार्यकर्त्यांच्या जोरावर आपण लोकसभा निवडणुकीचा फॉर्म भरणार असून

निवडणूक लढणार असल्याची घोषणा खासदार दिलीप गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24
Tags: Dilip Gandhi

Recent Posts