पाथर्डी :- आमदार मोनिका राजळे यांनी न केलेल्या कामांचे श्रेय घेऊ नये, असे प्रतिपादन भगूरचे सरपंच वैभव पुरनाळे यांनी केले.
आ. राजळे यांनी तालुक्यात गावागावात केलेल्या कामांची यादी प्रसिद्ध करून पत्रके वाटली. या यादीमध्ये भगूर येथील दोन विकासकामांचा उल्लेख आहे;
परंतू भगूर येथे झालेली विकासकामे जि. प. जनसुविधा व समाजकल्याण विभागांतर्गत झालेली असून, ही कामे मा. सरपंच सुनील गरूड, मा. उपसरपंच शाहूराव पुरनाळे यांनी सौ. हर्षदा काकडे यांच्यामार्फत केलेली आहेत.
त्या कामांशी आ. राज़ळे यांचा काहीही संबंध नसताना निवडणूक जवळ आल्याने न केलेल्या कामांचे आ. राज़ळे श्रेय घेत आहेत, असा आरोप पुरनाळे यांनी केला आहे.